मोदींनी केला नाशिक, त्र्यंबक, शिर्डीचा उल्लेख; 'वंदे भारत'ला दाखवला हिरवा झेंडा

मोदींनी केला नाशिक, त्र्यंबक, शिर्डीचा उल्लेख; 'वंदे भारत'ला दाखवला हिरवा झेंडा

मुंबई | Mumbai

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मुंबईत (Mumbai) 'वंदे भारत' एक्स्प्रेसचे (Vande Bharat Express) उद्घाटन करण्यात आले. नरेंद्र मोदी यांनी मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. आपल्या भाषणात मोदी म्हणाले की, रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला आज आनंद होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्व मंत्रिमंडळ आणि सर्व बंधू-बघिणींनो आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी आणि मुंबई-महाराष्ट्रासाठी खूप मोठा आहे.

आज पहिल्यांदाच मुंबईत दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्या आहेत. या वंदे भारत ट्रेन पुणे आणि मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक सेंटरना मोठ्या केंद्रांना जोडेल. यामुळे कॉलेजला ये-जा करणारे विद्यार्थी, ऑफिसला ये-जा करणारे कर्मचारी, शेतकरी आणि भाविकांसाठी सर्वांना सुविधा होणार आहे.

मोदींनी केला नाशिक, त्र्यंबक, शिर्डीचा उल्लेख; 'वंदे भारत'ला दाखवला हिरवा झेंडा
अल्पवयीन मुलीची हत्या करून बापाने उचलले 'हे' टोकाचे पाऊल

ते पुढे म्हणाले की, वंदे भारतमुळे महाराष्ट्रात पर्यटन आणि तीर्थयात्रेला मोठा फायदा होणार आहे. नाशिक येथील रामकुंडाला जायचे असेल, त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीचे दर्शन करायचे असेल, शिर्डीत साईबाबांचे दर्शन घ्यायचे असल्यास या ट्रेनमुळे हे सगळे अत्यंत सुलभ होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मोदींनी केला नाशिक, त्र्यंबक, शिर्डीचा उल्लेख; 'वंदे भारत'ला दाखवला हिरवा झेंडा
धक्कादायक! तरुणाचा कबड्डी खेळताना मैदानातच मृत्यू

तसेच मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमुळे पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई, सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, आणि आई तुळजाभवनीच्या दर्शन घेणे अत्यंत सोपे होणार आहे. मी मुंबई आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना वंदे भारताच्या ट्रेनसाठी अभिनंदन करतो, असे मोदी म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com