पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात लोकप्रिय नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात लोकप्रिय नेते

13 नेते पिछाडीवर; अमेरिकेतील संस्थेचे सर्वेक्षण

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister of India Narendra Modi ) जगातील सर्वात लोकप्रिय नेते (most popular leader ) ठरले आहेत. जगातील 13 नेत्यांना मागे टाकून मोदी यांनी हा लौकिक मिळवला आहे. अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स व जर्मनीसह 13 देशांतील नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान मोदींची लोकप्रियता सर्वाधिक असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून जाहीर झाला आहे.

अमेरिकेतील ‘ग्लोबल लीडर अ‍ॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्ट ( ‘Global Leader Approval Tracker Morning Consult )’ या संस्थेने जगातील नेत्यांच्या लोकप्रियतेबाबत सर्वेक्षण केले. त्यात पंतप्रधान मोदी यांना 70 टक्के गुणांकन मिळाले. दर आठवड्याला सर्वेक्षणाची माहिती अद्ययावत केली जाते.

पंतप्रधान मोदी लोकप्रियतेत मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटालियन पंतप्रधान मारियो ड्रॅगी, जर्मन चान्सलर अँजेला मर्केल, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या पुढे गेले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता प्रौढांमध्ये सर्वात कमी असल्याचेही या सर्व्हेेक्षणाचा निष्कर्ष आहे. भारतात सर्व्हेक्षण केलेल्या प्रौढांपैकी 25 टक्के लोकांनी मोदींना नापसंत केले आहे. मॉर्निंग कन्सल्टने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात केलेल्या सर्व्हेक्षणात 13 जागतिक नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर होते. यावर्षीच्या जून महिन्यात त्यांचे गुणांकन 66 टक्क्यांवर घसरले होते. ऑगस्ट 2019 मध्ये मोदींचे गुणांकन 82 टक्क्यांवर होते, पण गेल्या दोन वर्षांत त्यात घट झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com