पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर 'हा' घणाघात

पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर 'हा' घणाघात

रामगुंडम । वृत्तसंस्था Ramgundam

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी तेलंगणा ( Telangana ) दौर्‍यात जनतेला संबोधित करताना तेलंगणा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोक मला विचारतात तुम्ही थकत नाहीत का? त्यावर मी रोज 2-3 किलो शिव्यांचा आहार घेतो म्हणून थकत नाही.परमात्म्याने माझ्यामध्ये अशी रचना केली आहे, की या सगळ्या शिव्या माझ्यामध्ये प्रक्रिया होऊन जीवनसत्वांमध्ये रुपांतरीत होतात. एक सकारात्मक ऊर्जा तयार होते, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana Chief Minister K. Chandrasekhar Rao)यांचे नाव न घेता ते भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणात सहभागी असल्याचे म्हटले आहे. राज्याला मकुटुंब नव्हे, प्रथम जनतेचेफ सरकार हवे आहे. तुम्ही मोदींना शिव्या द्या, भाजपाला शिव्या द्या, पण तुम्ही तेलंगणातील जनतेला शिव्या दिल्या तर तुम्हाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल असेही म्हटले आहे. मोदींनी मला तेलंगणातील कामगारांसाठी वैयक्तिकरित्या प्रार्थना करायची आहे. हताश, भीती आणि अंधश्रद्धेतून काही लोक मोदींच्या विरोधात अनेक शिव्या देतील. त्यांच्या फसवणुकीमुळे दिशाभूल होऊ नये अशी मी प्रार्थना करतो असे म्हटलें आहे. केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीत राज्य सरकार जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘गो बॅक मोदी’चेही नारे

पंतप्रधान मोदींच्या दौर्‍याला जोरदार विरोध करण्यात आला. यासाठी काही भागात त्यांच्याविरुद्ध बॅनरबाजी करण्यात आली. त्यावर त्यांना रावणाच्या रूपात दाखवण्यात आले आहे. शनिवारी रामगुंडम परिसरात पंतप्रधान मोदींच्या विरोधात काही आक्षेपार्ह बॅनर्स लावल्याचे दिसून आले. त्यावर मोदींना रावण असल्याचे दाखवले आहे. तसेच, पंतप्रधानांनी तेलंगणाला दिलेल्या नऊ प्रकल्पांच्या आश्वासनाचे काय झाले?, असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com