महागाईतून दिलासा! 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झाला LPG Cylinder

महागाईतून दिलासा! 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झाला LPG Cylinder

दिल्ली | Delhi

महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडरचे दर कमी झाले आहेत. वाढती महागाई लक्षात घेता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मात्र, देशभरातील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात (Commercial Cylinder Price) ही कपात झाली आहे. आजपासून (मंगळवार) १९किलोचा व्यावसायिक LPG सिलेंडर ११५.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. पण, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. ६ जुलैपासून घरगुती सिलेंडरच्या किंमत स्थिर आहेत.

गॅस सिलेंडरचे नवीन दर काय?

दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे नवे दर १७४४ रूपये झाले आहे. यापूर्वी १८५९.५० रूपये मोजावे लागत होते. चेन्नईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर यापूर्वी २००९.५० रूपयांना मिळत होता. दर कपातीनंतर याची किंमत आता १८९३ रूपये झाली आहे. तर कोलकात्यात एलपीजी सिलिंडर आता १९९५.५० रूपयांना मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com