Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक पोलिसांवर माझ्या विरोधात कारवाई करण्यासाठी दबाव - संजय राऊत

नाशिक पोलिसांवर माझ्या विरोधात कारवाई करण्यासाठी दबाव – संजय राऊत

मुंबई | Mumbai

गेल्या आठवड्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले होते. त्यावेळी राऊत यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीसांसह इतर अधिकाऱ्यांनी आदेशाचे पालन करु नये,असे वक्तव्य केले होते…

- Advertisement -

त्यानंतर या वक्तव्याप्रकरणी नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) कलम ५०५ (१) अंतर्गत संजय राऊत यांच्याविरोधात काल गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरून आज सकाळी संजय राऊत यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचबरोबर माध्यमांशी बोलतांना देखील याविषयावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nashik : पिकअपचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

राऊत आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत की, ‘नाशिक पोलिसांनी (Nashik Police) माझ्या विरोधात भा. द. वि. कलम ५०५ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकारचे “गठन” बेकायदेशीर ठरले आहे. व्हिपपासून शिंदे यांना गटनेतेपदी निवड करण्यापर्यंत सगळेच घटना विरोधी ठरवले आहे. सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील अशी स्थिती आहे. बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनाने पाळू नयेत. भविष्यात खटले दाखल होतील.असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का? सरकारने थेट गुन्हाच दाखल केला मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे’, असे संजय राऊतांनी म्हटले.

Jayant Patil : जयंत पाटलांना पुन्हा ईडीचे समन्स

तसेच माध्यमांशी बोलतांना राऊत म्हणाले की, जरी माझ्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी मी कारवाईला सामोरे जाणार आहे. माझ्यावर दबाव टाकून मला शरण यायला भाग पाडणे, शिवसेना (Shivsena) सोडायला लावणे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोडायला लावणे, अशा प्रकारची दबावनिती सुरू आहे. मात्र, या दबावनीतीला आम्ही बळी पडणार नाही. प्रत्येक कारवाईला सामोरे जाण्याची धमक आहे. त्यावेळी बोललो ते अधिकाऱ्यांना भडकवण्याचा हेतू नव्हता, ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या सरकारविरोधात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, त्यावरून माझे मत व्यक्त केले. यात माझा अपराध काय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या