लालपरी मार्गावर येणार : कर्मचाऱ्यांचा मुळ पगारात वाढ, विलिकरणाचा निर्णय समितीच्या अहवालानंतर

लालपरी मार्गावर येणार : कर्मचाऱ्यांचा मुळ पगारात वाढ, विलिकरणाचा निर्णय समितीच्या अहवालानंतर

कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार, सेवा समाप्ती मागे घेणार- परब

संप मागे घेतला नाही तर शासन म्हणून जे करणे शक्य आहे, ते आम्ही करु- परब

कामगारांनी एसटीचा संप मागे घ्यावा, ही विनंती- अनिल परब

राज्य सरकारला ७५० कोटींची तरतूद यासाठी करावी लागेल.

जे कामगार हजर होणार नाही, त्यांच्यांवर कडक कारवाई. सर्व कर्मचाऱ्यांनी उद्या कामावर यावे. जे बाहेरगावी असतील,त्यांनी तातडीने कामावर याव्यात.

10 ते 20 वर्षे सेवा- मूळ वेतनात 4 हजार रुपयांची वाढ होणार आहे.   20 वर्षापेक्षा अधिक सेवा झालेत त्यांना 2 हजाराची वाढ करण्यात येणार आहे.

जे कर्मचारी 1 ते 10 वर्ष कॅटेगरीत आहेत त्यांना 5000 रुपये पगार वाढ होणार आहे.  ज्यांचा पगार 12 हजार 80 रुपये होतं त्याचं आता 17 हजार होणार आहे. ज्यांचा पगार 17 होता तो 24 हजार पगार होणार आहे. सर्वसाधारण सात हजाराची वाढ  म्हणजेच 41 टक्के पगार वाढ करण्यात येत आहे.

एस.टी.कर्मचाऱ्यांचा पगार १० तारखेपर्यंत होणार, राज्य शासन त्याची जबाबदारी घेणार

राज्यात गेले काही दिवस सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कर्मचाऱ्यांचा मुळ पगारात वाढ करणार आहे.

उच्च न्यायालयाने समिती नेमली होती. ही समिती विलिनिकरणाचा निर्णयसंदर्भात १२ आठवड्यात अहवाल देणार. हा अहवाल आम्ही लागू करु- अनिल परब

Related Stories

No stories found.