Presidential Elections 2022 : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा कोणाला?


Presidential Elections 2022 : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा कोणाला?

दिल्ली l Delhi

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Elections 2022) १८ जुलै रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेत (Shivsena) बंड उफाळून आल्यानं पक्षात उभी फूट पडली आहे. आता शिवसेना द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देणार की, यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना?, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

दरम्यान काल शिवसेनेकडून खासदारांची (Shivsena MP) बैठक मातोश्रीवर आयोजित केली होती. या बैठकीत शिवसेनेच्या खासदारांनी भाजपच्या (BJP) राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली.

यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. तसेच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा विरोध डावलून बहुतांश खासदारांच्या मागणीला प्राधान्य देत उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचीही माहिती मिळत आहे.

कोण आहे द्रौपदी मुर्मू ? (Who Is Draupadi Murmu)

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात झाला. बिरांची नारायण तुडू असे त्यांच्या वडिलांचे नाव आहे. त्या संताल कुटुंबातील आहे, जो एक आदिवासी वांशिक गट आहे. मुर्मू या प्रदीर्घ काळापासून भाजपशी जोडलेल्या आहेत.

१९९७ मध्ये त्या रायरंगपूरमधून पहिल्यांदा नगर पंचायतीत नगरसेवक झाल्या. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूरमधून २ वेळा आमदारही राहिल्या आहेत. त्या भाजपा आणि बिजू जनता दलाच्या (BJD) युती सरकारमध्ये मंत्रीही होत्या. द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. तसेच २००० मध्ये स्थापन झाल्यापासून ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या त्या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल आहेत. राज्यपाल बनलेल्या त्या पहिल्या ओडिया नेत्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com