राष्ट्रपतीपदाच्या उमेदार मुर्मू आज मुंबईत, पण....

राष्ट्रपतीपदाच्या उमेदार मुर्मू आज मुंबईत, पण....

मुंबई l Mumbai

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आज (गुरुवार) मुंबईत येत आहेत. आज दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान द्रौपदी मुर्मू या मुंबईत दाखल होणार आहेत.

त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे विमानतळावर जाणार आहेत.

द्रौपदी मुर्मू या मुंबईत भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार व खासदार आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदार यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.

दरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुर्मू यांना पाठिंबा घोषित केला आहे, मात्र त्यांना किंवा शिवसेनेला या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं नसल्याची माहिती मिळत आहे.

विशेष म्हणजे, एकेकाळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यासाठी केंद्रीय नेते थेट मातोश्रीवर येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेत असत.

बाळासाहेबांनी देखील पक्षभेद बाजूला सारून व्यक्तीला महत्त्व देत दोनदा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला होता. शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्यावर प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांनी बाळासाहेबांचे आभारही मानले आहेत. पण यावेळी मात्र शिवसेना दुर्लक्षितच राहिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com