Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याराष्ट्रपती निवडणूक : पहिल्या फेरीत द्रौपदी मुर्मू आघाडीवर; मिळाली 'इतकी' मतं

राष्ट्रपती निवडणूक : पहिल्या फेरीत द्रौपदी मुर्मू आघाडीवर; मिळाली ‘इतकी’ मतं

नवी दिल्ली । New Delhi

राष्ट्रपतीपदासाठी (President Election) १८ जुलै रोजी मतदान झाल्यानंतर आज गुरुवारी २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून संसद भवनात (Parliament House) मतमोजणीला (Voting) सुरुवात झाली आहे. यानंतर आता पहिल्या फेरीचा निकाल हाती आला असून यात एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आघाडी घेतली आहे. तसेच आतापर्यंत खासदारांच्या (MP) मतांची मोजणी पूर्ण झाली आहे…

- Advertisement -

पहिला फेरीत (First Round) द्रौपदी मुर्मू यांना खासदारांची ५४० मते मिळाली आहेत. तर यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना २०८ मते मिळाली आहेत. मुर्मू यांना मिळालेल्या मतांची व्हॅल्यू ३,७८,००० तर सिन्हा यांना मिळालेल्या मतांचे मुल्य १,४५,६०० एवढे होत आहे. तर दुसरीकडे एनडीएकडे असलेल्या खासदारांच्या संख्येपेक्षा जास्त मते मुर्मू यांना मिळाली आहेत. यामुळे विरोधकांची मते फुटल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे.

दरम्यान, सध्या विविध राज्यांच्या आमदारांच्या (MLA) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तर १८ जुलै रोजी झालेल्या मतदानात संसदेत ७२८ जणांनी मतदान केले होते. त्यात ७१९ खासदार आणि ९ आमदारांचा समावेश होता. या आमदारांना संसद भवनात मतदान करण्याची परवानगी मिळाली होती.तसेच सध्या मतांची आकडेवारी बघता एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या