राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष करोनाबाधित

राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष करोनाबाधित

मथूरा | Mathura - राम मंदिर ट्रस्टचे (Ram Mandir Trust) अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास महाराज करोनाबाधित (coronavirus) आढळले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी दिल्ली येेथे हलविले जात आहे.

ते कृष्णजन्माष्टमीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मथूरा येथे आले होते. सकाळी अचानक त्यांनी प्रकृती बिघडली. आठवड्यापूर्वी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यात ते व्यासपीठावर उपस्थित होते.

अयोध्या (Ayodhya) येथे राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यात महंत यांच्यासह व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) , उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagvat) होते.

महंत नृत्य गोपालदास यांच्यावर उपचारासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com