राष्ट्रपतींकडून देशातील 44 शिक्षकांचा गौरव

रामनाथ कोविंद
रामनाथ कोविंद

नवी दिल्ली :

देशभरात आज शिक्षक दिन (teacher day)साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेल्या देशभरातील 44 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (award)जाहीर करण्यात आला आहे. या सर्वांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद (ramnath kovind)यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. देशातील कोरोना स्थिती अद्याप नियंत्रणात आली नसल्याने या वर्षीचा कार्यक्रम हा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, "डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण हे एक आदर्श आणि विद्वान व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. त्यांनी अनेक महत्वाची पदं भूषवली पण आजही त्यांची ओळख ही एक शिक्षक म्हणूनच आहे. आज मला देशातील शिक्षकांचा गौरव करताना अत्यंत आनंद होत आहे." राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामांच्या कार्याचाही उल्लेख केला.

रामनाथ कोविंद
बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त कोवीड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2021’ चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रपती भवनातून राष्ट्रपती तर शास्त्रीभवनस्थित शिक्षण मंत्रालयातून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, शिक्षण राज्यमंत्री सर्वश्री अनुपमा देवी, डॉ.सुभास सरकार आणि डॉ. राजकुमार रंजन सिंग उपस्थित होते.

देशाच्या विविध भागातून या कार्यक्रमात सहभागी 44 शिक्षकांना उल्लेखनीय योगदानासाठी विविध श्रेणींमध्ये गौरविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील आसरअली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील कडदोरा (जगदंबानगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्याच्या आसरअली येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व उपक्रमशील शिक्षक खुर्शीद शेख यांनी शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळाच ठसा उमटविला आहे. श्री. शेख या भागातील आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. भाषेच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना येत असलेली अडचण दूर करण्यासाठी श्री. शेख यांनी ‘ मी सुध्दा रिपोर्टर’ हा उपक्रम यशस्वीरित्या राबविला. त्यांनी शिक्षणातील नवनवीन उपक्रमांचा अवलंबन करून आपल्या शाळेत महत्त्वपूर्ण बदल घडविले आहेत. विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी शाळेत आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घडवून आणला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कडदोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक उमेश खोसेयांनी ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण उपलब्ध करून दिले.श्री. खोसे यांनी परिसरातील १०० टक्के विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात यश मिळविले.विद्यार्थ्यांना शिक्षणाचे उत्तम साधने उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल क्लासरुम तयार केली.तांड्यावर मुलांना ऑफलाइन शिकता यावे यासाठी स्वतंत्र ५१ऑफलाइन ॲपची निर्मिती केली. व्हिडिओ निर्मिती करून विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची संधी उपलब्ध करून दिली. तांड्यावरील मुलांना त्यांच्याच भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी पहिलीचे पुस्तक अनुवादित करून त्याचे डिजिटल साहित्यही निर्माण केले आहे.

रामनाथ कोविंद
आता स्वस्तात करता येणार AC चा प्रवास
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com