Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याराष्ट्रपतींनी केली देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपालांची बदली; वाचा सविस्तर

राष्ट्रपतींनी केली देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपालांची बदली; वाचा सविस्तर

नवी दिल्ली | New Delhi

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली असून त्यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचाही समावेश आहे…

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

काही दिवासंपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे आपल्याला राज्यपाल पदावरुन मुक्त करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. तसेच राज्यपाल कोश्यारींनी महापुरुषांबाबत वादग्रस्त विधानेही केली होती. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. अखेर आज त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर करण्यात आला. त्यानंतर कोश्यारी यांच्या जागी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; नव्या राज्यपालांचे नाव आले समोर

यासोबतच राष्ट्रपती मुर्मू यांनी अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालपदी लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, सिक्कीमच्या राज्यपालपदी लक्ष्मण प्रसाद आचार्य, झारखंडच्या राज्यपालपदी सीपी राधाकृष्णन, आसामच्या राज्यपालपदी गुलाबचंद काटरिया आणि हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी शिवप्रताप शुक्ला तर अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल बीडी मिश्रा यांची लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच मणिपूरचे राज्यपाल गणेशन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच बिहारचे राज्यपाल फागु चौहान यांची मेघालय तर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय आंध्रप्रदेशचे राज्यपाल बिस्व भूषण हरिचंदन यांची छत्तीसगडच्या तर छत्तीसगडचे राज्यपाल अनुसुईया उकिये यांची मणिपूरच्या व निवृत्त न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर यांची आंध्रप्रदेशच्या राज्यपालपदी (Governorship) नियुक्ती करण्यात आली आहे.

Ramesh Bais : नगरसेवक, केंद्रीय मंत्री ते राज्यपाल; जाणून घ्या, महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांची कारकीर्द

- Advertisment -

ताज्या बातम्या