Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याPadma Shri Awards 2023 : राष्ट्रपतींच्या हस्ते राज्यातील पाच मान्यवरांना 'पद्म पुरस्कार'...

Padma Shri Awards 2023 : राष्ट्रपतींच्या हस्ते राज्यातील पाच मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली | New Delhi

दरवर्षीप्रमाणे यंदाही पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा करण्यात आली आहे. पद्म पुरस्कार हे भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. कला, समाजकार्य, उद्योग, विज्ञान, वैद्यकीय, शिक्षण, साहित्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. तर पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन विभागांमध्ये हे पुरस्कार देण्यात येत असतात…

- Advertisement -

देशात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; गेल्या २४ तासांत आढळले ‘इतके’ रुग्ण

यावर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी राष्ट्रपती भवनच्या दरबार हॉलमध्ये पद्म पुरस्कार वितरण सोहळ्यात २०२३ वर्षासाठी तीन पद्मविभूषण, पाच पद्मभूषण आणि ४७ पद्मश्री पुरस्कार प्रदान केले.

यात महाराष्ट्रातील प्राध्यापक दीपक धर यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण तर कला क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. परशुराम कोमाजी खुणे, बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर श्रीमती कुमी नरीमन वाडिया आणि गजानन जगन्नाथ माने यांना सामाजिक कार्य क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

RBI कडून रेपो रेट जाहीर; तुमच्या EMI वर काही परिणाम होईल का? वाचा सविस्तर

दरम्यान, रवीना टंडन आणि एमएम कीरावनी यांच्यासह तबलावादक झाकीर हुसेन आणि तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका वाणी जयराम यांना अनुक्रमे पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. झाकीर हुसेन यांना याआधी १९९८ मध्ये पद्मश्री आणि २००२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या