Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याकरवाढ नसलेला मनपाचा शिलकी अंदाजपत्रक

करवाढ नसलेला मनपाचा शिलकी अंदाजपत्रक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) वर्ष 2023-24 साठीचे अंदाजपत्रक शुक्रवारी स्थायी समितीत सादर करण्यात आले.

- Advertisement -

चालू आर्थिक वर्षासाठी कोणतीही करवाढ (tax hike) नसलेला, 1.21 कोटी रुपये शिल्लकीचा अंदाजपत्रक मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी स्थायी समितीपूढे सादर केला. या आर्थिक वर्षात 2477.07 कोटी रुपये जमा होणार आहेत.

तर 2475.86 कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मनपाच्या स्थायी समितीच्या सभागृहात सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत लेखा व वित्त विभागाच्या (Accounts and Finance Department) अधिक्षकांद्वारे मनपा आयुक्तांना अर्थसंकल्प (Budget) सूपूर्द करण्यात आला.

या अंदाज पत्रकात महापालिकेस प्राप्त होणारे विविध कर, शुल्क, फी, अनुदाने व अन्य जमा होणार्‍या निधीमध्ये (fund) प्रामुख्याने2477.07 कोटी रुपये निर्धारित करण्यात आलेले आहेत. त्या निधीच्या माध्यमातून मनपा कार्यक्षेत्रात करावयाची विकास कामे (Development works) व पुरवावयाच्या सेवांसाठी होणार्‍या 2475.86 कोटी रुपये खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवून योग्य ताळमेळ घालण्याचा प्रयत्न केलेला असल्याचे मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Poolkundwar) यांनी सांगितले.

यातून 1 कोटी 21 लाख रुपये शिलकीचा अंजाद व्यक्त करण्यात आला आहे. या विकास कामात प्रामुख्याने शहरातील रस्ते, पदपथ, उड्डाणपूल, जलवाहिन्या, मलनि:स्सारण वाहिन्या, परिवहन, विद्युतीकरण, उद्यान विकास, शिक्षण, वैद्यकिय सेवा, घनकचरा व्यवस्थापन इ. नागरी सुविधांची पूर्तता करतांना समतोल विकासाचा प्रयत्न करण्यात आला आहे.

तसेच ई-गव्हर्नन्सचा (e-Governance) प्रभावी वापर करुन, सुलभ, पारदर्शक व गतिमान प्रशासकीय कामकाज करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच स्मार्ट स्कूल, पर्यावरण, नमामी गोदा, वैद्यकीय सेवा, आय.टी पार्क विकसीत करणे या बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला असल्याचे डॉ. पुलकूंडवार यांनी सांगितले.

शासनाचे भरिव निधीचे आश्वासन

शहरात उभारण्यात येणार्‍या आयटी पार्क व लॉजस्टिक पार्क सारख्या बहुूउद्देशिय प्रकल्पांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या स्तरावरून मनपास विविध योजना अंतर्गत भरीव निधी प्राप्त होईल याची मला खात्री दिल्याने हे प्रक्लप साकारणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

लवकरच नोकरभरती

मनपाचा 31 मार्च पर्यंत आस्थापनावर 34.04 टक्के खर्च झाला आहे शासनाच्या धोरणानुसार तो 45 टक्यांच्या आत आहे. शासनाद्वारे 75 हजार नोकर भरती केली जात असल्याने वर बोलताना मात्र नवीन नोकर भरती करण्यासाठी शासनाने हे निर्बंध शिथील केले असल्याने येणार्‍या काळात नवी नोकर भरतीकरणे शक्य आहे. शासनाच्या स्थरावरुन दोन एजंन्सी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. त्या माध्यमातून लवकरच नोकर भरती केली जाणार आहे.

यशवंत मंडईच्या जागी पार्कींग

गेल्या काळात यशवंत मंडईच्या ठिकाणी मल्टी स्टेअर पार्कींग उभारण्याचा प्रस्ताव होता.टेंडरला प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र मुंबइतील काही एजन्सीज यात रस दाखवत असल्याने लवकरच टेंडर काढले जातील. यशवंत मंडईसह जागा उपलब्ध होईल तेथे मल्टीलेवल पार्कींग उभारण्याचा मानस असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

वापरातील बदलावर होणार कारवाई

घरपट्टी पाणी पट्टीत वाढ करण्यात आलेली नसून, वापरात बदल केलेले असल्यास त्याचे सर्व्हेक्षण करण्यासाठी एजन्सी नेमली जाणार आहे. त्यामाध्यमातून मिळणार्‍या माहीतीच्या आधारे पट्टी लागू करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या