
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिका प्रशासनाने (municipal administration) यंदाच्या आर्थिक वर्षात जमेत गृहीत धरलेल्या निधी (fund) संकलनात कमकुवत ठरल्याने
तब्बल सव्वा चारशे कोटी रुपयांची उत्पन्नात तुट (Shortfall in income) आली असल्यामुळे आता सुधारित अंदाजपत्रक (budget) सादर करताना विविध विभागांच्या खर्चांना कात्री लावण्याच्या सूचना लेखा विभागाने दिल्याने अधिकारी वर्गाची धांदलउडाली आहे.
महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक (Annual budget) सुमारे अडीच ते तीन हजार कोटी रुपयांपर्यंत जाते. आगामी कुंभमेळ्यासाठी शहराला वळण रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्याबरोबर विकास आराखड्यात नवीन रस्ते हाती घेण्याचे प्रस्तावित असल्याने या कामांसाठी महापालिकेच्या मिळकत विभागाने सुमारे साडेपाच हजार कोटी रुपयांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे.
महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रकातून शहरातील ’आरोग्य (health), रस्ते (road), पाणी (water), स्वच्छता, दिवाबत्ती या मूलभूत समस्यांवर खर्च करण्याबरोबरच महापालिकेचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प, विकास आराखड्यातील रस्ते, त्यासाठीचे भूसंपादन अशा विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची आवश्यकता असते.
या शिवाय कर्मचार्यांचे वेतन, भत्ते, वेतनेतर अनुदान अशा प्रशासकीय कारणांसाठी खर्च होत असतो. या शिवाय कर्मचार्यांचे वेतन, भत्ते, वेतनेतर अनुदान अशा प्रशासकीय कारणांसाठी देखील जवळपास 60 टक्के रक्कम खर्च होत असल्याने महापालिकेचे उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ घालताना लेखा विभागाला कसरत करावी लागते.
निधीचा आढावा
जमेच्या एकत्रित बाजूंचा अंदाज घेता जवळपास 450 कोटी रुपयांची तूट दिसून येत आहे
प्रत्यक्षात मालमत्ता करातून 151 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते (80 कोटी रुपये प्राप्त)
नगर रचना विभागाकडून 302 कोटी रुपये अपेक्षित होते ( आत्तापर्यंत 135 कोटी रुपये प्राप्त)
पाणीपट्टीचे उद्दिष्ट 75 कोटी रुपये होत (आतापर्यंत 41 कोटी रुपये प्राप्त)
मिळकत विभागाकडून 200 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित( 25 कोटी रुपये प्राप्त)
घरपट्टीचे 189 कोटी रुपयांची उद्दिष्ट (आतापर्यंत 80 कोटी रुपये जमा)