दहिवड | मनोज वैद्य Dahivad
नाशिक जिल्ह्यासह देवळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळ, वारा व पावसाचा धडाका मागील तीन चार दिवसांपासून चालू आहे.
आज बुधवार दिनांक 8 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दहिवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे तीन खोल्यांचे व मधल्या भागातील मोकळ्या जागेतील निम्मे पत्र उडून दुसऱ्या बाजूच्या पत्र्यांवर उलटे पडले.
सुदैवाने सध्या मार्च महिना असल्याने सकाळची शाळा आहे दुपारी विद्यार्थी शाळेत नव्हते शाळा बंद होती, म्हणून मोठा अनर्थ टळला आहे. सदर घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी व तरुणांनी शाळेच्या शिक्षकांना कळविताच शिक्षक घटनास्थळी हजर झाले.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
वर्गखोल्या उघडून पाहणी केली असता काही वर्ग व कार्यालयातील कागदपत्रे व काही साहित्य ओली झाली असल्याचे निदर्शनास आले असून काही शैक्षणिक साहित्य देखील खराब झाले आहे. सदर घटनेबाबत पंचनामा सुरू असल्याचे समजते.