Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यादेवळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

देवळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

भऊर | प्रतिनिधी Bhaur

देवळा तालुक्यातील ( Deola ) भऊर, खामखेडासह ( Bhaur, Khamkheda )परिसरात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या ( Rain )सरी कोसळल्या. शेतकरी वर्गाची या वादळी पावसामुळे चांगलीच धांदल उडाली तर दुसरीकडे उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला.

- Advertisement -

आज दि. १८ रोजी सकाळपासून वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत असताना, सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे पोळ घातलेला कांदा झाकण्यासाठी कांदा उत्पादकांची चांगलीच दमछाक झाली.

पावसाबरोबर आलेल्या जोरदार हवेमुळे मिरची तसेच चारा पिकाचे काही प्रमाणत नुकसान झाले. ऊसा सारख्या पिकांना मात्र या पावसाचा दिलासा मिळणार असल्याचे शेतकरी सांगतात.

कोबी, टोमॅटो सारख्या भाजीपाला पिकावर मात्र करपा, तुडतुडी सारख्या रोगाचा प्रादुर्भाव या पावसामुळे वाढणार असल्याने , शेतकरी वर्गाचा फवारणीचा खर्च देखील वाढणार आहे. जोरदार आलेल्या वादळामुळे आंबा पिकाचे देखील काही काही प्रमाणत नुकसान झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या