Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याकुंंभमेळ्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करा

कुंंभमेळ्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

देशभरातून लाखो श्रद्धाळूच्या गर्दीने साजर्‍या होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने तयारीला प्रारंभ केला आहे. मनपा आयुक्त अशोक करंजकर यांनी मनपाच्या सर्व विभागांना कामाच्या दृष्टीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

सीएससी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरावर अतिरिक्त गर्दीचा भार पडणार आहे. त्यामुळे येणार्‍या भाविकांना द्याव्या लागणार्‍या सेवासुविधांचा विचार करून शहरातील मूलभूत सुविधांमध्ये वाढ करावी लागणार आहे. त्याच्या कामांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी मनपा आयुक्तांनी सर्व विभागांना सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सद्यस्थितीत मनपामध्ये नवीन अधिकार्‍यांची टीम कार्यरत आहे.यापूर्वी सिंहस्थ पाहिलेले जुने अधिकारी निवृत्त झालेले असल्यामुळे कार्यक्रमाच्या नियोजन आयोजनात आयत्या वेळी पडणारा ताण याबाबतचा अनुभव अधिकार्‍यांकडे नसल्याने त्यावेळी जुन्या अनुभवी निवृत्त अधिकार्‍यांची मदत घेतली जाणार आहे. त्याबाबतच्या जुन्या नोंदींचा आधार घेऊन सविस्तर अहवाल तयार करण्याची सूचना आयुक्तांनी दिली आहे.

शहराच्या विविध उपक्रमांमध्ये कार्यरत असलेल्या उदा. जिल्हाधिकारी कार्यालय, परिवहन मंडळ, राज्याचे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जलसंपदा विभागांच्या माध्यमातूनही विकासकामांचा आराखडा तयार केला जाणार असला तरी, मुख्य भूमिका मनपाची राहणार असल्याने मुख्य समन्वयक म्हणून प्रकल्प तयार करण्यासाठी सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे सिंहस्थांसंदर्भात बैठक घेऊन सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.त्यावेळी त्यांच्यासमोर सादर केल्या जाणार्‍या प्रकल्पातील अत्यावश्यक बाबींना तातडीने राज्यशासनाकडून मंजुरी करून कामे सुरू करुन घेतली जाणार असल्याचे वृत्त आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या