सुशासन नियमावली तयार करा - मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

सुशासन नियमावली तयार करा - मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेऊन त्यांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरित्या मिळावा यासाठी सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती यांची सांगड घालून सुशासन नियमावली करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभ आणि पारदर्शी पद्धतीने मिळाव्यात यासाठी सुशासन नियमावली तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीची वर्षा निवासस्थानी बैठक झाली. त्यावेळी शिंदे यांनी शासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी सुशासन नियमावलीत कोणत्या बाबींचा समावेश असावा याचा उहापोह केला.प्रशासनाचे सुशासन होण्यासाठी सुशासन नियमावली उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आदिवासी विकास, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देऊन अन्य राज्यांना आदर्श ठरेल, अशी नियमावली तयार करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. लोकांचे काम वेळेवर झाले तरच त्याला सुशासन म्हणता येईल. नागरिकांना कामांसाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये, त्यांची भटकंती थांबावी, क्षेत्रीयस्तरावरच त्यांच्या समस्यांचा निपटारा व्हावा मंत्रालयापर्यंत त्यांना यायची गरज भासू नये, असेही शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com