Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यासिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयारी सुरु

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयारी सुरु

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मलजलशुध्दिकरण प्रकल्पाचे नूतनीकरण व जलशुध्दिकरण प्रकल्प उभारण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी तयार करण्यात येणारे आराखडे तांत्रिक तपासणीसाठी सल्लागार म्हणून आयआयटी पवईची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

यापुढे या सर्व विकास कामांमध्ये मनपा आयआयटी पवईच्या तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन घेणार असून, जेणेकरुन त्या माध्यमातून भविष्याच्यादृष्टीने प्रकल्प उभारताना ते निर्दोष राहतील. महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरु केली आहे. कुंभमेळा नाशिकच्या विकासासाठी पर्वणी ठरत असून, रस्ते, पाणीपुरवठा यांसारखे कोट्यवधीच्या कामांचे आराखडे संबंधित विभागाकडून तयार केले जात आहे.

पाणीपुरवठा विभागाकडून कोट्यवधीचे कामे केले जाणार आहे. त्यात अमृत योजनेअंतर्गत शहरात नव्या जलवाहिन्या टाकणे, मलजलशुद्दिकरण प्रकल्प उभारणे, जलशुध्दिकरण प्रकल्प बांधणे या कामांचा समावेश आहे. पाणी पुरवठा विभागाकडून अकरा मलजल शुध्दिकरण केंद्राचे नूतनीकरण केले जाणार आहे. केंद्राच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून गंगापूर येथे 49 कोटी रुपये खर्च करुन नवे मलजल शुध्दिकरण केंद्र उभारले जात आहे. शिवाय मखमलाबाद व कामटवाडा येथे नवीन जलशुद्दिकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.

यापुढे सर्व प्रकल्पाचे आराखडे तयार केल्यावर तांत्रिक मंजुरीसाठी आयआयटी पवईला पाठवले जातील. महापालिकेने त्यासाठी आयआयटी पवईला तांत्रिक सल्लागार म्हणून नेमले आहे. आयआयटी पवईकडून सर्व बारकावे तपासत तांत्रिक तपासणी केली जाईल. त्यांच्या कसोटीवर तांत्रिक बाबी योग्य असतील तरच प्रकल्प आराखड्यास मंजुरी दिली जाईल. त्यानंतरच मनपा सबंधीत ठेकेदारला काम करण्यास ग्रीन सिग्नल देण्यात येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या