पालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाने दिले हे निर्देश
USER

पालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाने दिले हे निर्देश

प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे आदेश

जळगाव - Jalgaon

डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपरिषदा, नगरपंचायती (Nagar Parishad, Nagar Panchayat) व नवनिर्मित नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूभ प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) दिला आहे.

पालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाने दिले हे निर्देश
केंद्र-राज्य भांडणात पडायचं नाही, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्या

पालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीस सदस्याऐवजी एक सदस्यीय पद्धत असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे (state election commission)उपआयुक्त अविनाश सणस यांनी यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना परिपत्रक पाठवले आहे. त्यात डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीतील मुदती संपणाऱ्या नगरपरिषदा / नगरपंचायतींची (nagar palika election)व्यापकता विचारात घेता प्रारूप प्रभाग रचनेची कार्यवाही सुरु करण्याचे आदेश दिले आहे.

काय आहे आदेश

१) महाराष्ट्र नगरपरिषदा / नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २०२० अन्वये सर्व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पध्दती लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असेल. तसेच प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिध्द केलेली लोकसंख्येची अलिकडची आकडेवारी म्हणजेच सन २०११ ची लोकसंख्या विचारात घ्यावयाची आहे.

२)प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना या पत्राद्वारे दिल्या आहेत. प्रभाग रचनेबाबत आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचना, मा. न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग रचना नियमातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे, असे म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com