गर्भातील बाळाला करोनाचा देशातील पहिला प्रकार
मुख्य बातम्या

गर्भातील बाळाला करोनाचा देशातील पहिला प्रकार

पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु

Rajendra Patil Pune

पुणे Pune

- पुण्यातील ससून रुग्णालयात हडपसर परिसरात राहणारी एक २२ वर्षीय गर्भवती महिलेच्या गर्भात असतानाच बाळाला करोना लागण झाल्याचे समोर आले आहे. गर्भात असतानाच करोनाचा संसर्ग झाल्याची ही देशातील पहिली घटना असल्याचं ससूनच्या अधिष्ठातांनी म्हटले आहे.

संबंधित महिला प्रसुतीच्या एक दिवस अगोदर ताप आल्यानं मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णालयात भरती झाली होती. महिलेची आरटी-पीसीआरद्वारे करोना चाचणी करण्यात आली. चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर अॅण्टीबॉडी टेस्ट करण्यात आली, त्यात महिलेला करोना असल्याचं निदान झालं होतं,” अशी माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोगशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. आरती किणीकर यांनी दिली.

“बाळाचा जन्म झाल्यानंतर नाकातील स्वॅब घेण्यात आला. त्याचबरोबर नाळ आणि नाभीच्या तपासणीनंतर तिला करोना झाल्याचं निष्पन्न झालं. बाळाची आरटी-पीसीआरद्वारे करोना चाचणी करण्यात आली होती. बाळाला २४ ते ४८ तासाच्या आतच लक्षणं दिसून आली. तापासह करोनाची अनेक लक्षणं बाळामध्ये दिसून आली. बाळाची नाभी आणि नाळातील संसर्ग ओळखण्यास सक्षम होतो. आईलाही संसर्ग झालेला होता, मात्र त्याची काही लक्षणं दिसत नव्हती,” असं किणीकर म्हणाल्या. “या केस संदर्भातील आमचा रिसर्च पेपर प्रकाशित करण्यासाठी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय जर्नलकडे पाठवला होता. तो स्वीकारण्यात आला आहे. त्याचं स्वीकृती पत्रही काल रात्री आम्हाला मिळालं आहे,” अशी माहिती किणीकर यांनी दिली.

“प्रसुतीनंतर बाळाची व्यवस्थितपणे काळजी घेण्याची गरज होती. तशी घेतली गेली. तीन आठवड्यानंतर बाळ पूर्णपणे बरं झालं. जूनमध्ये बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला,” असं बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितलं.

Deshdoot
www.deshdoot.com