Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यायोगा कम रिसॉर्टसला नाशकात पसंती

योगा कम रिसॉर्टसला नाशकात पसंती

नाशिक । दिनेश सोनवणे | Nashik

करोनाकाळात (corona) सर्वच आरोग्याची काळजी (Health care) घ्यायला लागले आहेत. जशी मागणी वाढत आहे तसतसे अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत. आल्हाददायक वातावरण असलेल्या निसर्गरम्य ठिकाणांमध्ये (Scenic places) नाशिकचे (nashik) नाव आता अग्रभागी घेतले जात आहे. एकीकडे मेडिकल हब (Medical Hub) होऊ पाहणार्‍या नाशिकने सर्वच क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती साधली आहे.

- Advertisement -

नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरात आता योगसाधनेची केंद्रे (Yoga centers) उभी राहत आहेत. रिसॉर्टस कम योगा (yoga) ही संस्कृती रुजत चालली असून परदेशातून अनेक पाहुणे याठिकाणी येऊन योगा शिकून घेत आहेत. यामुळे येणार्‍या काळात नाशिकची वाटचाल योगा हब (Yoga Hub) होण्याकडे दिसते आहे.विशेष म्हणजे, आयुर्वेदातही (Ayurveda) आता योगाची सांगड घातली जात असून अबालवृद्धांमध्ये आता योगाभ्यास दिवसागणिक वाढलेला दिसतो आहे.

नाशकात आता गोव्याच्या धर्तीवर अनेक मेडीटेशन सेंटर (Meditation Center) आणि रिसॉर्टसची संख्या वाढत चालली आहे. धार्मिक नगरी म्हणून नाशिकची असली ओळख तरीदेखील तंदुरुस्तीसाठी योगसाधनेला विशेष महत्व याठिकाणी प्राप्त होत आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) दरवर्षी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. दररोज योगा केल्याने तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.

शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगा खूप फायदेशीर मानला जातो. योग केल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. स्नायूंची ताकद वाढते. तसेच तुमची श्वसन, ऊर्जा रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) बळावते. नियमित योगासने केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबीही कमी होते. योगामुळे तणाव दूर होतो. चांगली झोप लागते. योगामुळे तुमची पचनक्रियाही सुधारते. यामुळे आपोआपच आपण ताजेतवाने राहण्यास मदत होते.

आजकाल अनेकजण लठ्ठपणा (Obesity), मधुमेह (Diabetes), उच्चरक्तदाब (Hypertension), कोलेस्टेरॉल (Cholesterol) इत्यादींच्या विळख्यात अडकत चालले आहेत. योगाभ्यास केल्याने व्यक्ती शारिरीक आणि मानसिक स्वस्थ (Physically and mentally healthy) राहते. योग (yog), मेडीटेशन (Meditation), प्राणायाम (Pranayama) ज्या ठिकाणी केले जातात तिथले वातावरण तितकेच प्रसन्न असावे लागते.अगदी म्हणूनच नाशिकमधील इगतपुरीत विपश्यना केंद्र वसले आहे. तिथे दरवर्षी हजारो नागरिकांची वेटिंग लिस्ट असते. दुसरीकडे त्र्यंबकेश्वर तालुक्यातही अनेक योगसाधना केंद्र आहेत. याठिकाणी वेगवेगळ्या देशातील अनेक नागरिक योगा थेरपीसाठी नाशकात दाखल होत असतात.

गंगापूर, गिरणारे, धोंडेगाव या परिसरात अनेक रिसॉर्टस आता उभे राहिले आहेत. याठिकाणी रिसॉर्टस कम योगा किंवा योगा रिट्रीट थेरेपीसाठी अनेक नागरिक येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, गोव्याच्या धर्तीवर नाशकात अनेक रिसॉर्टस किंवा केंद्र उभी राहिली असून निसर्गरम्य ठिकाणी ही केंद्रे उभी करण्यासाठी प्रयत्न झालेले दिसत आहेत.

याठिकाणी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:साठी केव्हा आणि किती वेळ द्यायला हवा याबाबतचे मार्गदर्शन याठिकाणी केले जाते. योगाला अलीकडे मिळालेली प्रसिद्धी आणि त्याचे आरोग्यावर झालेले सकारात्मक परिणाम यामुळे योगाचे आकर्षण वाढले आहे. यादरम्यान, साउंड थेरेपी,मड थेरेपी, जलनीती व विरेचनसारख्या उपचार पद्धतीदेखील केल्या जात असल्यामुळे योगासोबतच अनेक पर्याय याठिकाणी उपलब्ध होत आहे

रुग्णांवर हार्ट, कॅन्सर किंवा अस्थिरोगावरील उपचार पद्धतीसोबतच मानसिक आणि शारीरिक मन आणि तन संतुलित ठेवण्यासाठी योगाभ्यास शिकवला जातो. वेगवेगळ्या आजारांवर औषधे आहेतच पण योगसाधना झाल्यामुळे या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आजाराला सामोरे जाताना ते लवकर बरे होतात. बंगलोर येथून नामांकित योगाचार्य याठिकाणी येऊन योगाभ्यासाचे धडे देतात.

– डॉ. संजय पाटील, हार्ट संजीवनी सेंटर मल्टी मेडिकल रिसर्च इन्स्टिट्युट, धोंडेगाव नाशिक

योगा ही लाईफस्टाईल आपण तंत्रज्ञानाकडून परत योगाजवळ येऊन पोहोचलो आहोत. ही संधी न दवडता आपण निरोगी आयुष्याकडे वाटचाल करत असताना योगाभ्यास अंगिकारला पाहिजे. योगाचे अनेक शिक्षक नाशकात तयार झाले असून आवड म्हणून ते गार्डन, हॉल नदीकाठी अनेकांना मोफत योगा शिकवत आहेत. नियमित योगसाधना निरोगीपणाचे द्योतक आहे.

– विशाखा सूर्यवंशी, योग शिक्षिका

योग आणि आयुर्वेदाची सांगड गरजेची आयुर्वेदामध्ये पंचकर्म असतात त्याचपद्धतीने योगा अभ्यासामध्ये षटक्रिया यांचा समावेश असतो. यामध्ये धौती, बस्ती, नेती, नौली, त्राटक, कपालभांती यांचा समावेश असतो. आयुर्वेदामध्ये योगाला अनन्यसाधारण महत्व आहे. दैनंदिन जीवनात शारीरिक तसेच मानसिक आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. वेदांमध्ये योगाभ्यासाची माहिती पूर्णपणे दिलेली आहे.योगशास्त्राच्या सहाय्याने मन आणि बुद्धी नियंत्रित होत असल्याचा दाखला आपल्याला ऋग्वेदात दिसून येतो.

– डॉ. सौ. किरण कातकाडे, एमडी (आयुर्वेद)

- Advertisment -

ताज्या बातम्या