आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप पदाधिकार्‍यांच्या अटकपूर्व जामिन मंजुर

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप पदाधिकार्‍यांच्या अटकपूर्व जामिन मंजुर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील भाजप (BJP) प्रदेश पदाधिकारी तथा माजी नगरसेविका इंदुमती नागरे (Former corporator Indumati Nagare) यांचे पुत्र विक्रम नागरे आणि भाजपचे नवीन नाशकातील माजी नगरसेवक मुकेश शहाणे (Former corporator Mukesh Shahane) यांच्यावर घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) अनिरुध्द शिंदे याला आत्महत्येस प्रवृत्त (suicide) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर दोघा संशयितांनी (दि.28) जिल्हा व सत्र न्यायालयात (District and Sessions Court) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता न्यायालयाने आज (दि.२) अटीशर्थीवर त्यांचा जामीन मंजूर (Bail granted) केला. याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) भरविर खुर्द येथे राहणार्‍या व सातपूर पोलीस ठाण्यातील खंडणीच्या (Extortion) गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या अनिरुद्ध शिंदे याने (दि.27) दुपारी भरवीर खुर्द ता. इगतपुरी या गावी राहत्या घरी आत्महत्या (suicide) केली होती.

त्यानंतर मयत शिंदे यांच्या पत्नीने घोटी पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकारी विक्रम नागरे आणि भाजपचेच माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना दोषी सांगत त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. दरम्यान मयत अनिरुद्ध शिंदे यांच्यासह दिपक भालेराव,रोशन काकड,गणेश लहाने,गौरव उर्फ गुलब्या घुगे,संजय जाधव व जया दिवे यांच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात विक्रम नागरे यांनी खंडणीसह, दगडफेक करणे, पोस्टर फाडणे व जिवे ठार मारण्याची धमकी देणे याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर जामिनावर सुटल्याने या सर्व संशयितांवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केल्याने सर्व संशयित लपत फिरत होते. त्यातच नागरे व शहाणे हे वारंवार शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटूंबीयांंना त्रास देत असल्याचे त्यांंनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानंतर मानसिक तणावात येत शिंदे यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी शिंदे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यामध्ये नागरे व शहाणे यांच्या नावाचा उल्लेख केल्याने पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणावर आज (दि.२) अटीशर्थीवर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com