मुख्यमंत्र्यांनीही हनुमान चालिसाचे पठण करावे; दरेकरांचा सल्ला

मुख्यमंत्र्यांनीही हनुमान चालिसाचे पठण करावे; दरेकरांचा सल्ला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यावर भारनियमनाचे (Load Shedding) संकट आले आहे. भारनियमनाविरुद्ध भाजप (BJP) आक्रमक भूमिका घेणार आहे. विज मंडळ आणि शासनाविरोधात भाजप जोरदार आंदोलन (Agitation) करणार असल्याचा इशारा प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिला आहे....

नाशिक महानगर भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलत आहे.

यावेळी पत्रकारांनी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचून राज्यातील प्रश्न सुटणार का? अशी विचारणा केली असता त्यावर ते म्हणाले की, हनुमान चालिसा वाचून प्रश्न सुटणार, असे म्हणता येणार नाही.

मात्र धर्मासाठी आणि हिंदुत्वासाठी हनुमान चालीसा वाचणे चांगले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही हनुमान चालिसाचे पठण करावे आणि या उपक्रमाला पाठींबा द्यावा, असे दरेकर म्हणाले.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत बोलताना दरेकर म्हणाले की, राऊतांनी आम्हाला राम शिकवू नये. राम आमच्या नसानसात भिनलेला आहे. शिवसेनेनेच (Shivsena) हिंदुत्व सोडले आहे. त्यामुळे राऊतांनी पहिले आत्मपरीक्षण करावे, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे.

सविस्तर वृत्त थोड्यावेळात....

Related Stories

No stories found.