Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशपश्चिम बंगाल निवडणुकीचे हिरो प्रशांत किशोर सल्लागाराचे काम सोडणार

पश्चिम बंगाल निवडणुकीचे हिरो प्रशांत किशोर सल्लागाराचे काम सोडणार

नवी दिल्ली

पश्चिम बंगाल निवडणुकीचे हिरो व ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी ठरली. त्यांनी निवडणुकीआधी असा दावा केला होता, की जर भाजपला तीन अंकी जागांवर विजय मिळाला तर मी राजकीय सल्लागाराचे काम सोडेल. त्यांचा दावा खरा ठरला. २०० जागांच्या विजयाचा दावा करणारी भाजप शंभरीपर्यंतही पोहचू शकली नाही. आपला दावा खरा ठरल्यानंतरी प्रशांत किशोर आता राजकारणातून संन्यास घेणार आहे.

- Advertisement -

अखेरी नंदुग्राममधून ममता बॅनर्जी विजयी

सलग दोन टर्म सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला यावेळी भाजपने जोरदार लढत दिली. भाजपच्या दिग्गज नेते यावेळी ममता बॅनर्जींविरोधात मैदानात उतरले होते. भाजपकडून प्रचारासाठी विविध राज्यातील आमदार, खासदारपासून स्टार प्रचारकांची टीम होती. परंतु ममता बॅनर्जी एकट्या होत्या. यावेळी भाजप २००+ चा दावा करत होती. यावेळी निवडणूक रणनितिकार प्रशांत किशोर ममता बॅनर्जी यांच्यासोबत होते. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, जर भाजपला तीन अंकी जागांवर विजय मिळाला तर मी राजकीय सल्लागाराचे काम सोडेल. आता त्यांचा दावा खरा ठरला. परंतु ते राजकीय सल्लागाराचे काम सोडणार आहे.

का सोडणार सल्लागारचे कामकाज

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना प्रशांत किशोर म्हणाले,“आता माझ्यासाठी ब्रेक घेण्याची वेळ आली आहे. जीवनात अजून वेगळे काही करु इच्छितो. माझी कंपनी I-PAC आता सोडणार आहे आणि आता निवडणूक रणनितीचे काम करणार नाही. आता माझ्या टीममधील इतर सहकारी ही जबाबदारी घेतील.” राजकारणात येणार का? या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, मी अयशस्वी राजकारणी आहे. यामुळे आता राजकारणात येण्याचा प्रश्नच नाही.

भाजपवर काय बोलले

तृणमूल काँग्रेसमध्ये जी लोके पक्षासाठी डोईजड झाली होती. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, गुंडागर्दीचे आरोप होते अशा लोकांना भाजपने आपल्या पक्षात स्थान दिले आणि या लोकांच्या जोरावर ते विजयाचे स्वप्न पाहत होते. मीडियानेही ही लोके सोडून गेल्यानंतर तृणमूल काँग्रेसला भगदाड, पक्ष संपला…अशा बातम्या चालवल्या. पण प्रत्यक्षात ममता दीदींच्या पक्षातला हा कचरा होता तो भाजपने उचलला. ही लोके सोडून गेल्याचा तृणमूल काँग्रेसला फटका बसेल असा अंदाज सर्वांनी वर्तवला होता परंतू तसे झाले नाही.

प्रशांत किशोर यांना कुठे-कुठे यश मिळाले?

गुजरात विधानसभा निवडणूक- २०१२

2011 मध्ये भाजपसाठी ‘वाइब्रेंट गुजरात’ का स्ट्रक्चर प्रशांत किशोर यांनी तयार केला. यावेळी भाजपला 182 मधून 115 जागा मिळाल्या. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.

१६ वी लोकसभा निवडणूक

गुजरातमधील यशानंतर २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे भाजपने दिली. यावेळी भाजपला २८२ जागा मिळाल्या.

बिहार विधानसभा -२०१५

जेडीयू, आरजेडी व काँग्रेससाठी बिहार विधानसभेच्या निवडणूक प्रशांत किशोर यांनी रणनिती केली. त्यावेळी या आघाडीला 243 पैकी 178 जागा मिळाल्या.

2017 – पंजाब विधानसभा

2017 मध्ये प्रशांत किशोर यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीत कॅप्टन अमरिंदर सिंग व काँग्रेससाठी काम केले. 117 पैकी 77 जागा.

2017- यूपी विधानसभा

2017 उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर काँग्रेससाठी काम केले. मात्र यावेळी मोठा पराभव काँग्रेसचा झाला. 403 पैकी 47 जागा काँग्रेसला मिळाल्या. प्रथमच प्रशांत किशोर यांची निवडणूक रणनिती अयशस्वी ठरली.

2019 आंध्र प्रदेश विधानसभा

प्रशांत किशोर 2019 मध्ये आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेससाठी काम केले. त्यावेळी वायएसआरला 175 पैकी 151 जागा मिळाल्या.

2020 दिल्ली विधानसभा

2020 मध्ये दिल्ली विधानसभेसाठी प्रंशात यांनी आम आदमी पार्टीसोबत काम केले. आपला 70 पैकी 62 जागा मिळाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या