प्रकाश आंबेडकरांचे महाविकास आघाडीत जाण्याबाबत मोठे विधान; म्हणाले...

प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर

मुंबई | Mumbai

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेना-वंचितच्या युतीची घोषणा केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) प्रकाश आंबेडकर महाविकासआघाडीचा भाग असल्याचे म्हटले होते. पंरतु, युतीच्या घोषणेनंतर अवघ्या काही दिवसातच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक विधान केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे...

आंबेडकर म्हणाले की, आपली युती शिवसेनेशी (ठाकरे गट) असून महविकास आघाडीशी (Mahavikas Aghadi) नाही. त्यामुळे महविकास आघाडीत जाण्याची आपली इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच शरद पवार (Sharad Pawar) हे लेफ्टला पाहतात आणि राईटला हात देतात असा टोला देखील आंबेडकर यांनी यावेळी पवारांना लगावला आहे. आंबेडकर यांच्या या भूमिकेमुळे वंचित मविआत जाण्याची शक्यता धूसर झाली आहे.

तसेच पुढे ते म्हणाले की, आम्ही वंचित असू तर आमची दखल नका घेऊ. महाविकास आघाडीचा भाग होण्याची माझी इच्छा नाही अस मी म्हणणार नाही. पण आमची युती शिवसेनेशी (shivsena) आहे. जागा वाटपाबाबत उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे. शिवसेना आणि वंचित एकत्र लढली आणि बाकी एकत्र नाही आले तरी आम्ही सरकार बनवू असेही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी दोन वेळा उद्धव ठाकरे यांच्याकडे युती संदर्भातील प्रस्ताव दिला होता. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबडेकर यांची शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर ठाकरे आणि आंबेडकरांनी युतीची (Alliance) घोषणाही केली. परंतु, आता प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे युतीबाबच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com