ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान

ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान

मुंबई | Mumbai

वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना हे दोन्ही पक्ष आगामी राजकीय वाटचालीसाठी एकत्र येणार असल्याच्या शक्यतेवरून महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात चर्चेला उधान आले आहे. या युतीचा जो काही निर्णय असेल तो लवकरच घोषित व्हावा अशी कार्यकर्त्यांचीही अपेक्षा आहे, मात्र दोन्हीही पक्षातील नेत्यांकडून अधिकृत घोषणा व्हायला मोठा विलंब होत असून युतीसंदर्भात आता वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे.

यावेळी ठाकरे गटासोबतच्या युतीसंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले सध्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर रायगडमध्ये (Raigad) आहेत आणि मी विदर्भात आहे. त्यामुळे अधिकृत घोषणा एकतर माझ्याकडून व्हायला हवी किंवा त्यांच्याकडून व्हायला हवी. घोषणा कधी होईल? तर बोलणी करण्यासाठी दोन्ही बाजूंचे गट बसलेले आहेत. त्यांचं अंतिम झालं की त्यानुसार घोषणा होईल. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या बातम्यांमध्ये तथ्य नाही त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की,'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (Congress and NCP) आम्हाला नाकारलेलं होतं. आम्ही त्यांना नाकारलेलं नाही, आम्ही केवळ दलितांपूर्वी पुरतं मर्यादित राहावं अशी काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका आहे. त्यांची ती भूमिका आम्हाला मान्य नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत बोलत नाही. त्यांना गरज असेल तर त्यांनी आमच्याशी बोलावं, असेही आंबेडकरांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com