Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकसबा-चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वंचितची भूमिका काय? प्रकाश आंबेडकर म्हणाले...

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वंचितची भूमिका काय? प्रकाश आंबेडकर म्हणाले…

नाशिक | Nashik   

पुण्यातील कसबा विधानसभा मतदार (Kasba Assembly) संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे (Chinchwad) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक (By-elections) होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीदेखील (Mahavikas Aghadi) ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची नेमकी काय भूमिका आहे, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

याविषयी वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमची शिवसेनेशी युती आहे. आम्ही शिवसेनेला विनंती केली होती की, त्यांनी या दोन्ही जागा लढवाव्यात. कारण गेल्या निवडणुकीत कसब्याच्या जागेवर काँग्रेसचा (Congress) पराभव झाला आहे आणि राष्ट्रवादीने (NCP) इथे उमेदवारच जाहीर केला नव्हता, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मित्रपक्ष शिवसेना (उबठा) काय भूमिका घेते त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. मात्र, शिवसेना या जागांवर लढणार असेल, तर नक्कीच आमचं समर्थन असेल, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिली आहे.

दरम्यान, ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपा आणि शिंदे गटाचा प्रयत्न आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षांशी आणि बड्या नेत्यांशी संपर्कदेखील केला आहे. याबाबत विचारले असता, लोकशाहीत (Democracy) बिनविरोधी ही संकल्पनाच नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच एखाद्या आमदाराचे निधन झाले, तर त्यांच्याबद्दल सहानुभूती असेल, याबाबत दुमत नाही. मात्र, येथील निवडणूक बिनविरोध व्हावी, ही प्रथा पडू नये. ही संकल्पना लोकशाहीत बसत नाही. त्यामुळे लोकांना नवीन लोकप्रतिनिधी निवडू द्यावे, या मताचा मी आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या