…तर मोदी-अमित शहांना तुरुंगात टाकू – प्रकाश आंबेडकर

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) ‘द मोदी क्वेश्चन’नामक दोन भागांची डॉक्युमेंट्री बनवली आहे. या डॉक्युमेंट्रीचा पहिला भाग १७ जानेवारी रोजी यूकेमध्ये (UK) प्रसारित करण्यात आला. तर दुसरा भाग २४ जानेवारी रोजी प्रसारित केला गेला. या डॉक्युमेंट्रीच्या पहिल्या भागात पंतप्रधान मोदींच्या राजकारणातील सुरुवातीच्या टप्प्याचा मागोवा घेण्यात आलेला आहे. ज्यामध्ये मोदी हे भारतीय जनता पक्षात (BJP)पुढे जात गुजरातच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचतात.

त्यासोबतच या डॉक्युमेंट्रीत २००२ साली गुजरातमध्ये (Gujarat)झालेल्या जातीय दंगलीत १ हजाराहून अधिक लोक मारले गेले. या प्रकरणाचाही उल्लेख आहे. पंरतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात हिंसाचारासाठी (Violence) आपण कोणत्याही प्रकारे जबाबदार असल्याचा आरोप फार पूर्वीपासून नाकारला आहे. तसेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) मोदींना या प्रकरणातून दोषमुक्त केलेले आहे.

मात्र, बीबीसीने प्रसारित केलेल्या डॉक्युमेंट्रीवर भाजपने आक्षेप घेत बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भाजपवर निशाणा साधला आहे. खडकवासला येथे आयोजित केलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशाचा मतदार हाच देशाचा मालक आहे. २०२४ मध्ये बिगर भाजप-आरएसएसचे सरकार येऊ द्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावरून आता भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *