राज्यात पैशांनी सत्तांतर झाले; शिंदेंसोबत सुरतला गेलेल्या आमदाराचा गौप्यस्फोट

राज्यात पैशांनी सत्तांतर झाले; शिंदेंसोबत सुरतला  गेलेल्या आमदाराचा गौप्यस्फोट

मुंबई | Mumbai

शिवसेनेत (Shivsena) बंडखोरी करत शिंदे गटातील (Shinde Group) आमदारांनी (MLA) सुरतमार्गे गुवाहाटी (Surat to Guwahati) गाठली होती. मात्र यात नितीन देशमुख हे शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत, जे गुवाहाटी येथून उद्धव ठाकरे यांच्याकडे परतले होते. त्यानंतर आता आमदार नितीन देशमुखांनी (MLA Nitin Deshmukh) राज्यातील सत्तांतरावर मोठे विधान केले आहे...

ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्तांतराच्या प्रत्येक क्षणाचा मी साक्षीदार आहे. महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) पाडण्यासाठी मागील दीड वर्षांपासून षडयंत्र सुरू होते. हे षडयंत्र आताचे नव्हते. त्यांनी माझ्यावर पुन्हा चुकीची कारवाई केली, तर मी माझ्याकडील क्लीप बाहेर काढणार. त्यांनी महाराष्ट्रात सत्तांतर घडवले. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या क्लिप्स माझ्याकडे आहेत, असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार आम्हाला पुढे न्यायचे होते, म्हणून आम्ही उठाव केला, असे जे महाराष्ट्रातले नेते सांगत आहेत त्यांच्या आवाजाची क्लिप जर मी बाहेर काढून दाखवली, तर त्यांना बोलायला जागा राहणार नाही. महाराष्ट्रात पैशाने सत्तांतर झाले हे जर मी सिद्ध करून दाखवले नाही तर या महाराष्ट्राच्या विधानसभेत (Legislative Assembly Maharashtra) आत्महत्या (Suicide) केल्याशिवाय राहणार नाही, असेही देशमुख म्हणाले.

तसेच एसीबीकडून (ACB) चौकशीची धमकी देऊन आम्हाला सुरतला नेले. मात्र आता आम्हीच येतो आम्हाला खुशाल जेलमध्ये टाका, या पक्षासाठी आम्ही जेलमध्येही जाण्यास तयार आहोत असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com