भूखंड विकास प्रस्तावाला स्थगिती- मनपा आयुक्त जाधव यांचे आदेश

भूखंड विकास प्रस्तावाला स्थगिती-  मनपा आयुक्त जाधव यांचे आदेश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेच्या ( Nashik Municipal Corporation )बहुचर्चित विविध ठिकाणच्या 11 भूखंडांच्या विकास प्रस्तावाला ( Plot development proposal )मनपा आयुक्त कैलास जाधव ( Municipal Commissioner Kailas Jadhav ) यांनी तूर्त स्थगिती आदेश ( Postponement order )दिला आहे. सत्ताधारी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ज्येष्ठ नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी तक्रार केली होती. म्हणून स्थगिती आदेश मिळाला आहे.

नाशिक शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या मालकीच्या 22 पैकी 11 मिळकतींचा बीओटीवर विकास साधण्याच्या सत्ताधारी भाजपच्या ड्रीम प्रोजेक्टला आयुक्त जाधव यांनी ब्रेक लावला आहे. या प्रकल्पासाठी नेमलेल्या सल्लागार संस्थेच्या संशयास्पद हालचालींकडे लक्ष वेधत शिवसेना, मनसेनासह अपक्ष नगरसेवकांच्या तीव्र विरोधानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी सल्लागार संस्थेला दिलेले कार्यारंभ आदेश तांत्रिक कारणास्तव तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे पत्र जारी केले आहे.

भाजपने मागच्या दाराने मंजूर केलेल्या 22 मिळकतींच्या खासगीकरणावरून गेल्या चार महिन्यांपासून महापालिकेत वादंग सुरू आहे. एका अशासकीय ठरावाच्या आधारे प्रशासनाने यातील मोक्याच्या 11 मिळकती बीओटी तत्वावर बिल्डरांना विकसित करण्यास चाल दिल्याने प्रशासनही या गैरकारभारात सामील झाल्याची टीका झाली होती.

विशेष म्हणजे यासंदर्भातील प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी विनानिविदा कमलेश कन्सल्टंट देवरे-धामणे आर्किटेक्ट’ या सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यात आल्याने या प्रकल्पाभोवती संशयाचे धुके निर्माण झाले. शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेले मनपाच्या मालकीचे शेकडो कोटींचे भूखंड विशिष्ट बिल्डरांच्या घशात घालण्यासाठीच हा सारा खेळ सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला होता.

मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांनीही या प्रकल्पाला उघडपणे विरोध दर्शवत मनपाचे आर्थिक नुकसान करणार्‍या या प्रकल्पाची अंमलबजावणी केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. माजी उपमहापौर गुरूमित बग्गा यांनी या प्रस्तावाविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com