कपड्यांवरील जीएसटीवाढ स्थगित

कपड्यांवरील जीएसटीवाढ स्थगित

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

नव्या वर्षात कपड्यांवर पाचऐवजी 12 टक्के जीएसटी GST लावण्याच्या निर्णयाला व्यापारीवर्गाकडून कडाडून विरोध होत होता. तो लक्षात घेऊन केंद्र सरकारने Central Government हा निर्णय मागे घेऊन कपड्यांवरील जीएसटी दरवाढ स्थगित केली आहे.

या निर्णयाचे कपडे व्यापार्‍यांनी स्वागत केले आहे. कपडा व्यावसायिकांना दिलासा मिळाला असला तरी चप्पल आणि बुटांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. साहजिकच नव्या वर्षात चप्पल आणि बुटांच्या किमतीत वाढ होणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन Union Finance Minister Nirmala Sitharaman यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 46 वी बैठक झाली. या बैठकीकडे कपडा व्यापार्‍यांचे विशेष लक्ष लागून होते. जीएसटी परिषदेच्या 17 सप्टेंबरच्या बैठकीत कपड्यांवरील जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला कपडा व्यापार्‍यांकडून कडाडून विरोध केला जात होता. हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली जात होती.

तामिळनाडू, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांनीदेखील कपडे आणि चप्पल, बुटांवर जीएसटीवाढीला बैठकीत विरोध केला. त्यामुळे कपड्यांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय अर्थमंत्र्यांना स्थगित करावा लागला. फेब्रुवारी 2022 पर्यंत कपड्यांवरील पाच ते 12 टक्के जीएसटी दरवाढ तूर्त स्थगित झाली आहे. रद्द मात्र झालेली नाही.

सध्या देशात मानवनिर्मित फायबरवर 18 टक्के जीएसटी आहे. एमएमएफ यार्नवर 12 टक्के तर कपड्यांवर पाच टक्के जीएसटी आहे. मात्र सप्टेंबर 2021 च्या बैठकीत कपडे आणि चप्पल बुटांच्या जीएसटी दररचनेत बदल करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला होता.

जीएसटी परिषद बैठकीत 1 जानेवारी 2022 पासून सर्व फुटवेअरवर 12 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दर सर्व किमतीच्या वस्तूंसाठी सारखाच असेल. चप्पल-बुटांवरील जीएसटी कमी करण्यावर पुढील बैठकीत निर्णय होईल, असेही बैठकीत सांगण्यात येऊन दिलासा देण्याचा प्रयत्न झाला.

Related Stories

No stories found.