Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकर्‍यांच्या जमिनीचा लिलाव स्थगित करा - खा.डॉ. पवार

शेतकर्‍यांच्या जमिनीचा लिलाव स्थगित करा – खा.डॉ. पवार

जानोरी । वार्ताहर

राज्यासह नाशिक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती, गारपीट, अतिवृष्टी शेतमालाला भाव नाही व त्यातच मागील एक वर्षापासून सुरू असलेल्या कोविड- 19 च्या साथीमुळे सर्वच शेतकरी कुटुंबियांवर कोसळलेले संकट अशा अनेक कारणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

- Advertisement -

शेतकर्‍यांचा शेतीवरच उदरनिर्वाह अवलंबून असून त्यांना दुसरा पर्याय नाही. आणि अशातच अधिच संकटात सापडलेल्या बळीराजाच्या शेतीचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने करण्याचा घाट नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासनाने घेतलेला असून सदरच्या लिलावास राज्य शासनाने त्वरित स्थगिती द्यावी व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, असे खा. भारती पवार यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बैठकी प्रसंगी मागणी केली .

ज्या शेतकर्‍यांनी वेळेवर कर्ज परतफेड केली आहे. ज्यांनी बँकेच्या नियमात बसून आपले कर्ज रक्कम अदा केली आहे, अशा शेतकर्‍यांना तत्काळ कर्ज उपलब्ध करून द्या. बैठकीत आढावा घेतला असता खरीप कर्ज 535 कोटी पैकी 229 कोटी कर्ज वाटप झाले आहे. नॅशनल बँकेच्या धर्तीवर ओटीएस स्कीम राबवण्याची सूचना ही केली. या बैठकीस नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक आरिफ शेख, बँकेचे चेअरमन केदा आहेर, डॉ. गिरासे, बँकेचे मुख्याधिकारी पिंगळे यांच्यासह बँक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या