टपाल भरतीचे सर्व्हर डाऊन

लिंक ओपन होईना: उमेदवारांमध्ये संभ्रम
टपाल भरतीचे सर्व्हर डाऊन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारतीय टपाल खात्याद्वारे महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये पोस्टमन, मल्टी टास्किंग स्टाफ आणि मेल गार्ड या पदांसाठी भरती होत आहे.

सोमवार (दि.5) पासून ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, दोन दिवसांनंतरही लिंकच ओपन होत नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. त्यातच पोस्ट खात्याचे सर्व्हर वारंवार डाउनची भर पडते आहे.

भारतीय टपाल विभागाने महाराष्ट्र पोस्टल सर्कलचा वाढता व्याप पाहता मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यात पोस्टमनची 1 हजार 029 , मेलगार्डची 15, तर मल्टी टास्किंग स्टाफ अंतर्गत डमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची 32 आणि सबऑर्डिनेट ऑफिसरची 295 अशी 1 हजार 371 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये नाशिक विभागात 29, तर मालेगाव विभागातील 13 जागांचा समावेश आहे. पोस्टात मोठी भरती होत असल्याने उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

टपाल विभागाकडून पोस्टमन, मेलगार्ड, तर मल्टी टास्किंग स्टाफसाठी इच्छुक उमेदवारांना 3 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र,https://doomah20.onlineaBplicationform.oro/MHPOST/ हे पोर्टलच सुरू होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहे. अर्ज भरण्याचे दोन दिवस कमी झाल्याने मुदतवाढ देण्याची मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.

रविवारी परीक्षा

येत्या रविवारी (दि.11) ग्रामीण डाकसेवक म्हणून कार्यरत असलेल्यांना मल्टी टास्किंग स्टाफमध्ये वर्ग करण्याकरिता परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी करोना पॉझिटिव्ह असलेल्या उमेदवारांना निगेटिव्ह असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे

भरतीप्रक्रियेत ऑनलाइन अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. मुंबई व दिल्ली कार्यालयासोबत संपर्क साधून तोडगा काढण्यात येईल. लवकरच पोर्टल पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, असे नाशिक टपाल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com