Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र२४५ दिवसांनी मंदिरे झाली खुली

२४५ दिवसांनी मंदिरे झाली खुली

नाशिक : तब्बल २४५ दिवसांनंतर नाशिक, नगर, जळगावसह राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळे आजपासून खुली झाली आहेत. यामुळे राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

आठ महिन्यांनी नाशिकमधील बहुतांश मंदिरे पहाटे चार ते पाचच्या सुमारास खुली करण्यात आली. कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देऊन दर्शन दिलं जात आहे. त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी येथील मंदिरही भाविकांसाठी खुली झाली. शिर्डी येथील मंदिरात पास नंतरच भाविकांना प्रवेश दिला जात आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि पंढरपुरातील विठ्ठल मंदिर व्यवस्थापनांनी दर्शनासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक केली आहे.दर्शनासाठी मुखपट्टी बंधनकारक आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या