Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यादेशात करोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता

देशात करोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता

नवी दिल्ली। वृत्तसंस्था

देशभरात करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून भारतात दिवसाला 3 लाखांच्या वर नवे करोनाबाधित सापडत आहेत. त्यासोबतच मृतांचा आकडा देखील सातत्याने 3500 च्या वर राहिला आहे. त्यातच आता केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी देशात करोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देशातील करोनाची सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील परिस्थिती याविषयी माहिती दिली. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था अजून सक्षम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यावर भाष्य केले आहे. भारतात करोनाची तिसरी लाट येणें अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि करोनाचा वेगाने होणारा प्रसार पाहाता ते होणार आहे. पण फक्त ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणें कठीण आहे. आपण या तिसर्‍या लाटेसाठी तयार राहायला हवें, असे ते म्हणाले.

भारतातील लसी प्रभावी

भारतात सध्या दिल्या जाणार्‍या लसी करोनाच्या सध्याच्या स्ट्रेनवर परिणामकारक असल्याचें देखील राघवन यांनी सांगितले. तसेच, करोनाचे नवे प्रकार जगभरात जसे आढळून येतील, तसेच ते भारतात देखील सापडणार आहेत, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या