मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता; हाय अलर्ट जारी

मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता; हाय अलर्ट जारी

मुंबई | Mumbai

खलिस्तान समर्थक गटांनी आखलेल्या दहशतवादी कारवायांची (Terrorist attack) माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये (Mumbai) हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे...

लुधियाना न्यायालयातील बॉम्बस्फोटांशी कथित संबंध असलेल्या शीख फॉर जस्टिस संघटनेचा (SFJ) सदस्य जसविंदर सिंग मुलतानी याला ताब्यात घेण्यात आले त्याची जर्मनीत चौकशी केल्यानंतर, मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये नियोजित दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात येत असल्याची माहिती, वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

एसजीएफ व्यतिरिक्त इतर प्रतिबंधित खलिस्तान समर्थक गट मुंबई, दिल्ली आणि देशातील इतर महत्वाच्या शहरात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयच्या (ISI) संपर्कात आहेत, अशी माहिती मिळत आहे.

शीख फॉर जस्टिस या संघटनेवर भारतात बंदी घालण्यात आलेली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांना अलर्ट जारी करण्यात आला असून सतर्क राहण्यास आणि संशयास्पद हालचालींकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.