भारतीय रेल्वेची ‘ही’ सुविधा बंद होण्याची शक्यता

jalgaon-digital
2 Min Read

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतातील रेल्वे (Railway) अधिक सुरक्षित आणि वेगवान केल्या जात असून या रेल्वे आपल्या दैनंदिन कामात तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करत आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रवाशांच्या (Passengers) सुविधांमध्ये देखील सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत. त्यातच आता रेल्वे आपले तिकीट छापखाने बंद करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात रेल्वे तिकीट प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होण्याची शक्यता आहे…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे बोर्डाने (Railway Board) या संदर्भातील आदेश विभागीय रेल्वेला दिले असून बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, भायखळा (मुंबई), हावडा (कोलकाता), शकूरबस्ती (दिल्ली), रोयापूर (चेन्नई) आणि सिकंदराबाद येथील सध्याचे रेल्वे छापखाने (Printing Press) बंद करण्यात येतील.

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? समोर आली ‘ही’ मोठी अपडेट

तसेच याठिकाणी रेल्वेची रिझर्व्ह आणि जनरल दोन्ही तिकिटे छापली जात होती. यासोबतच कॅशच्या पावत्या आणि ४६ प्रकारची मनी व्हॅल्यूचे कागदपत्रेही येथे छापण्यात आली. त्यानंतर आता त्याचे आदेश जरी दिले गेले असले तरी ही प्रेस बंद करण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये घेण्यात आला होता.

तर २०१७ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले होते की, सरकार तिकीट छपाईचे काम थर्ड पार्टी म्हणजेच खाजगी क्षेत्राकडे सोपवण्याचा विचार करत आहे. तसेच रेल्वे छापखाने बंद करण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचे बोलले जात असून रेल्वेकडे एकूण १४ प्रिंटिंग प्रेस होत्या, त्यापैकी ९ बंद करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. यानंतर रेल्वेकडे शिल्लक राहिलेले ५ छापखाने देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

…तर १६ आमदारांना अपात्रच करेन; नरहरी झिरवाळ स्पष्टच बोलले

ऑनलाइन तिकीट विक्रीत वाढ

रेल्वे आता तिकीट पूर्णपणे डिजिटल करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच सध्या काउंटरवरून फक्त १९ टक्के तिकिटे खरेदी केली जातात. त्याचवेळी ८१ टक्के तिकिटे ऑनलाइन विकली जात असून ही खूप मोठी संख्या आहे. त्यामुळे संपूर्ण डिजिटलायझेशनचे उद्दीष्ठ सहज गाठता येईल असे रेल्वेला वाटत असावे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *