Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याविचित्र अपघात! ट्रकमध्ये उतरला वीजप्रवाह नंतर फुटले टायर; ट्रकचालकासह हमालाचा दुर्दैवी...

विचित्र अपघात! ट्रकमध्ये उतरला वीजप्रवाह नंतर फुटले टायर; ट्रकचालकासह हमालाचा दुर्दैवी मृत्यू

पिंपळगाव बसवंत | वार्ताहर | Pimpalgaon Baswant

शेणखताची वाहतूक करणाऱ्या मालट्रकच्या पाठीमागील बॉडीला वीजप्रवाह सुरू असलेल्या तारेचा धक्का लागल्याने चालकासह हमालाचा मृत्यू झाल्याची घटना निफाड तालुक्यातील दावचवाडी येथे गुरुवारी (दि. १६) सकाळी घडली. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे…

- Advertisement -

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील दावचवाडी येथे गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास मुंबई येथील पारसनाथ गणपत पाल मालट्रकमधून (क्र.एमएच १५ बीजे ७४८३) शेणखत घेवून पिंपळगाव बसवंतमार्गे दावचवाडी गावात आले.

तेथून शेणखत खाली करणारे हमाल पप्पू सोमनाथ यादव व विजय प्रल्हाद शिंदे यांना गाडीमध्ये बसवून पालखेड शिवारातील शेतकरी बाळासाहेब नाना आहेर यांच्या शेतात दावचवाडी – पालखेड शिव रस्त्याने जात होते.

निफाडमध्ये अवकाळी पावसाने कोट्यवधीच्या नुकसानीची शक्यता

याठिकाणी लोंबकळलेल्या वीजवाहक तारेचा ट्रकला धक्का लागला. त्यामुळे ट्रकमध्ये वीजप्रवाह उतरला. त्यानंतर क्लिनर बाजूचे पाठीमागील टायर फुटले आणि चालक व हमाल बाहेर फेकले गेले. यात चालक आणि हमाल या दोघांचा मृत्यू झाला आहे.

हरसूलला वादळी वार्‍याने घरांचे नुकसान

तर हमाल पप्पू सोमनाथ यादव याने गाडीतून उडी मारली. तोपर्यंत वीजप्रवाह बंद झाल्याने तो वाचला. मृतांमध्ये ट्रकमालक पारसनाथ गणपत पाल (वय ६३, रा. घर नं. ६३०, शिवशक्ती नगर, ठाणे, बेलापूर रोड, तुर्भे स्टोर, नवी मुंबई, तुर्भे, ठाणे) व हमाल विजय प्रल्हाद शिंदे (वय ३९, मुळ रा. सोनुन, ता. चोंढी, जि. अकोला, ह. मु. दावचवाडी, ता. निफाड, जि. नाशिक) या दोघांचा समावेश आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

लोकसभेसाठी मविआच ठरलं? कोण किती जागा लढवणार; वाचा सविस्तर

इलेट्रीक शॉक लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक अशोकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे तपास करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या