Corona Vaccine लसीच्या वादंगावरुन अदर पुनावाला यांनी केला हा खुलासा

Corona Vaccine लसीच्या वादंगावरुन अदर पुनावाला यांनी केला हा खुलासा
अदर पुनावाला

नवी दिल्ली

कोरोना लस निर्मिती करणारे सीरम इन्सिस्ट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी लंडनमधून दिलेल्या मुलाखतीनंतर वाद निर्माण झाला आहे. लंडनमध्ये दिलेल्या मुलाखतीनंतर वाद निर्माण झाला आहे.

लंडनच्या एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत अदर पुनावाला यांनी केंद्राने सीरमकडे लसीची मागणी नोंदवली नव्हती, असे जाहीर केले. यानंतर केंद्र सरकारने पीआयबीमार्फत लसींच्या पुरवठ्याबाबत स्पष्टीकरण दिले होते. यानंतर बऱ्याच घडामोडी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

सीरम इन्सिस्ट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला त्यांच्या वक्तव्यानंतर लस उत्पादनावरून तसेच मागणीवरून सुरु झालेल्या गदारोळावर आता खुलासा केला आहे. त्यांनी निवेदन सोशल मीडियात सादर करताना आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विटरवर निवेदन प्रसिद्ध करताना म्हटले आहे की, “ मी केलेल्या वक्तव्यावर त्याचा विपर्यास करण्यात आला आहे. पहिल्यांदा मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की, लस निर्मिती ही विशेष प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याचे उत्पादन एका रात्रीत वाढवणे शक्य नाही. आपण हे सुद्धा समजून घेतले पाहिजे की भारतीय लोकसंख्या अवाढव्य आहे. आणि त्यासाठी पुरेशा लची निर्मिती करणे हे सोपे काम नाही. इतकचे नाही, तर अत्याधुनिक देश आणि कंपन्याही लहान लोकसंख्येसाठी झगडत आहेत.

Title Name
नाशकात अनेक लसीकरण केंद्र बंद : लसी शिल्लक असलेल्या केंद्रांवर गर्दी
अदर पुनावाला

केंद्राकडून सर्व मदत मिळाली

दुसरे म्हणजे, आम्ही गेल्या वर्षी एप्रिलपासून भारत सरकारबरोबर काम करत आहोत. आम्हाला वैज्ञानिक, नियामक आणि आर्थिक असो सर्व प्रकारचे समर्थन मिळाले आहे. आजपर्यंत आम्हाला एकूण 26 कोटी पेक्षा जास्त डोसचे ऑर्डर प्राप्त झाले, त्यापैकी आम्ही 15 कोटीहून अधिक डोस पुरविला. आम्हाला 100% आगाऊ रक्कम देखील मिळाली आहे. पुढच्या काही महिन्यांत 11 कोटी डोससाठी 1732.50 कोटी मिळाले आहेत. पुढील काही महिन्यांत राज्य आणि खासगी रुग्णालयांसाठी आणखी 11 कोटी डोस पुरवल्या जातील. आम्हाला हे समजते की प्रत्येकाला लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी असे वाटते. तेही आमचे प्रयत्न आहेत आणि ते मिळवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आम्ही आणखी कठोरपणे काम करू आणि कोविड विरुद्धचा भारताचा लढा मजबूत करू, असे त्यांनी म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com