पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्यात राजकारण तापले

पुजा चव्हाण
पुजा चव्हाणPooja Chavan

पुणे :

‘टिक टॉक'च्या माध्यमातून लोकप्रिय झालेली परळी वैजनाथ येथील तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले असताना व भाजपच्या अनेक नेत्यांनी यावरून थेट हल्ला केला आहे. दरम्यान पुजाच्या वडिलांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात राजकारण करु नका? असे त्यांनी सांगितले आहे.

टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण राज्यात चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे. पोलिस या प्रकरणी दबावात काम करत असल्याने या प्रकरणात कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याचा थेट आरोप फडणवीस यांनी केला आहे.

आत्महत्या नसल्याचा दावा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केली नसून ती चक्कर येवून पडली असे सांगण्यात येत आहे. पूजासोबत असलेल्या दोघांनी पोलिसांना जबाबात माहिती दिली आहे. शिवाय पूजाच्या रूममध्ये वाईनच्या बाटल्या सापडल्याची माहिती देखील समोर येत आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पोलिसांनी पूजाचा भाऊ विलास चव्हाण आणि त्याचा मित्र अरुण राठोड यांचे जबाब नोंदवले आहेत. पूजाच्या रुममध्ये दारुच्या बाटल्या सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. वानवडी पोलिसांनी याआधीच पूजाच्या आईवडिलांचा जबाब नोंदवला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com