Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रराठोड प्रकरण : काँग्रेसची शिवसेनेवर बोचरी टीका

राठोड प्रकरण : काँग्रेसची शिवसेनेवर बोचरी टीका

मुंबई :

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. या प्रकरणावरुन काँग्रेसने शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही.

- Advertisement -

काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेवर टीका करतांना सांगितले की, काँग्रेसच्या बाबतीत जेव्हा असे आरोप झाले होते, तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामे दिलेले आहेत, तेही चौकशी पूर्ण होण्याआधी.

अध्यक्ष काँग्रेसचाच

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक आता काही आमदार मंत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याने घेत नाहीत. पण हे पद काँग्रेसकडेच राहणार आहे. निवडणूक या अधिवेशनात पण शकते जर कोरोनाची भीती कमी वाटली तर, असेही संकेत पटोले यांनी दिलेत.

फडणवीस म्हणतात…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण इतकं गंभीर असूनही अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही. 20 दिवसानंतरही एफआयआर दाखल होत नाही याचा अर्थ काय? संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. माध्यमं आणि भाजपने हे प्रकरण लावून धरलं नसतं तर हे प्रकरण सरकारने दाबलं असतं, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राजीनामा देतो पण..

राजीनामा देतो पण या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा स्वीकार करावा अशी काहीशी भूमिका संजय राठोड यांनी घेतली होती. आपले मंत्रिपद टिकावे म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या