Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यागणेशोत्सवाच्या आडून राजकारण - आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका

गणेशोत्सवाच्या आडून राजकारण – आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या ( Ganesh Festival )आडून राजकारण ( Politics )करण्याचे भाजपचे ( BJP )प्रयत्न सुरु आहेत. हा त्यांचा बालिशपणा आहे. दोन वर्षानंतर लोक सणवार साजरे करीत आहेत. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून लोकांना सणाचा आनंद घेऊ द्या, अशा शब्दात शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Shiv Sena leader Aditya Thackeray)यांनी शुक्रवारी भाजपवर टीका केली.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांनी आज कुलाबा येथील फोर्टचा राजा आणि चंदनवाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आदित्य यांनी भाजपवर टीका केली. जे कोणी राजकारण करत आहे त्यांचा तो बालिशपणा आहे. इतके राजकारण झाले तर लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल. राजकारण बाजूला ठेवून लोकांना सणांचा आनंद घेऊ द्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मनसेच्या स्थानिक पदाधिका-याने कामाठीपुरा येथे ५७ वर्षीय महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य म्हणाले की, कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी-कार्यकर्त्याने असे वागणे योग्य नाही. एखाद्या महिलेवर असा हात उचलणे योग्य नाही. त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. ही कारवाई लोकांना दिसली पाहिजे.

- Advertisment -

ताज्या बातम्या