Political Big News : आठवड्याभरात जळगाव शहर महापालिकेच्या राजकारणात होणार मोठा धमाका....

जळगाव शहर महानगरपालिका
जळगाव शहर महानगरपालिकाjalgaon municipal corporation

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

मनपातील (Municipality) सत्तेमधील भाजपच्या 27 नगरसेवकांनी (corporators of BJP) बंडखोरी (Rebellion) करून शिवसेनेच्या महापौरांना (Vote for Shiv Sena mayor) मतदान करून शिवसेनेची जळगाव महापालिकेत सत्ता आणली होती. या विरोधात भाजपने विभागीय आयुक्तांकडे (BJP to Divisional Commissioner) या बंडखोर नगरसेवकांना अपात्र करण्यासंर्भात दाखल (Ineligible for corporators) याचिकेवर देखील लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 27 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाईची टांगती तलवार (Action against corporators) असून महापालिकेच्या राजकीय वर्तूळात मोठ्या राजकीय घडामोडी (Political Affairs) जळगावकरांना पाहण्यास मिळणार आहे.

महानगर पालिकेतील भारतीय जनता पार्टीचे 27 नगरसेवकांनी बंडखोरी करून शिवसेनेच्या महापौरांना मतदान केले. त्यामुळे भाजपने या बंंडखोर नगरसेवकांवर अपात्रेची कारवाई करण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेवर विभागीय आयुक्तांकडे कामकाज सुरू असतांना भाजपचे बंडखोर 27 नगरसेवकांवर कारवाई होवू नये म्हणून महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सर्वोच्चन्यायालात विभागीय आयुक्तांकडे आव्हाण देणारी याचीका दाखल केली होती.

जो पर्यंत अधिकृत गटनेता कोण याचा निकाल लागत नाही, तो पर्यंत विभागीय आयुक्तांनी 27 नगरसेवकांना अपात्र करण्याचे निर्णय देवू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नाशिक विभागीय आयुक्तांना दिले होते. मात्र भाजपचे तत्कालीन गटनेते भगत बालाणी यांनी राजिनामा दिल्यामुळे सवोच्च न्यायालयात महापौरांनी दाखल केलेली याचिका ही रद्द होईल व विभागीय आयुक्तांना देण्यात आलेली स्थगिती रद्द होईल. त्यामुळे विभागीय आयुक्तांकडून 27 नगरसेवकांवर अपात्र होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्यामुळे 27 नगरसेवकांचा निकाल आठवडा भरात लागण्याची शक्यता आहे.

अधिकृत गटनेता कोण याबाबत होती याचिका

भाजपच्या नगरसेवकांनी बंडखोरी करून शिवसेनेच्या महापौरांना मतदान करून शिवसेनेची सत्ता जळगाव महापालिकेत आणली होती. या बंडखोरांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी भाजपने विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात महापौर, उपमहापौरांनी धाव घेवून भाजपा गटनेता अ‍ॅड. दिलीप पोकळे कि भगत बालाणी अधिकृत कोण बाबत मुद्दा उपस्थित करून विभागीय आयुक्तांच्या निर्णयावर स्थगिती आणली होती.

तर सभागृहातील संख्याबळ कमी होणार

विभागीय आयुक्तांकडून 27 नगरसेवकांबाबत अपात्रेसंदर्भात निकाल लागल्यास जळगाव मनपातील सभागृहातील संख्याबळ कमी होणार आहे. आधीच चार नगरसेवक अपात्र झाल्यामुळे सदस्य संख्या 45 पर्यंत येणार आहे. त्यात 27 नगरसेवकांमध्ये उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा देखील समावेश आहे.

राजकीय घडामोडी घडणार

बंडखोरी करून भाजपाला रामराम केलेल्या 27 नगरसेवकांनी शिवसेने सोबत गेले होते. परंतू राज्यात संत्ताकर झाल्यावर या बंडखो नगरसेवकांमध्ये फुट पडून काही शिंदे गटात तर उद्दव ठाकरे गटात आहे. तर त्यातील काही पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याचे दिसत असून आगामी मनपा निवडणूकीच्या आधी कोण कुठे जाणार हे उत्सुकतेचे राहणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com