
परभणी । Parbhani.
ठाकरेंनी (Thackeray) पोराला मंत्री (Minister) करायला नको होते. आणि पोराला मंत्री करायचे होते तर स्वतः मुख्यमंत्री (Chief Minister) व्हायला नको होते, असे प्रतिपादन खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच घरचा आहेर दिला आहे.
हिंगोलीत बालतांना जाधव यांनी शिंदेंनी पक्षात गद्दारी का झाली? एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष का फोडला यावर भाष्य करताना थेट उद्दव ठाकरे यांच्याकडे बोट दाखवले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मंत्रीपदाच्या दोन खुर्च्या अडल्या गेल्यामुळे बाप गेला तरी पोरगा माझ्या डोक्यावर बसणारच असे एकनाथ शिंदे यांना वाटले यामुळेच त्यांनी बंड केले. दोघेही मंत्री झाल्यामुळे उद्धवसाहेबांचे दुर्लक्ष झाले, त्यांना लक्ष देता आले नाही, त्यामुळेच चाळीस चोरांना संधी मिळाली असेही जाधव म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे असलेले नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांना दिले. त्यानंतरही त्यांनी गद्दारी केली. आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात कोणत्याच मुख्यमंत्र्याने नगरविकास खाते दुसर्या कुणाला दिले नव्हते, ते तुम्हाला दिले तरी तुम्ही गद्दारी केली, अशी टीका देखील जाधव यांनी यावेळी केली.