नव्या वर्षात राजकीय रणधुमाळी

राज्यसभा, विधान परिषदेसह मनपा, जिल्हा परिषद निवडणुका
नव्या वर्षात राजकीय रणधुमाळी

मुंबई । उद्धव ढगे-पाटील | Mumbai

  • आघाडी विरुद्ध भाजप सामना

  • 2022 निर्णायक वर्ष

नव्या 2022 या वर्षात राज्यसभा (Rajya Sabha), विधान परिषदेसह (vidhan parishad) राज्यातील महापालिका (Municipal Corporation), नगरपालिका (Municipality), नगरपंचायत (nagar panchayat), जिल्हा परिषद (zilha parishad) आणि पंचायत समित्यांसाठी (panchayat samiti) निवडणूक (election) अपेक्षित आहे. त्यामुळे नवे वर्ष राजकीय रणधुमाळीचे ठरणार असून या वर्षात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (bjp) आणि मित्रपक्ष असा सामना रंगणार आहे.

महाविकास आघाडीने तिसर्‍या वर्षात पदार्पण केले आहे. परिणामी स्थानिक निवडणुकीत सरकारच्या दोन वर्षांच्या कारभाराबद्दल जनतेचा कौल आघाडीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे तर 2024 ची विधानसभा निवडणूक (election) डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांना मोर्चेबांधणी, युती अथवा आघाडीसाठी हे वर्ष निर्णायक ठरणार आहे. महाराष्ट्रातून (maharashtra) राज्यसभेवर निवडून गेलेल्या सहा खासदारांची मुदत यावर्षीच्या उत्तरार्धात म्हणजे जुलै महिन्यात संपत आहे.

त्यात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Union Minister Piyush Goyal), शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचा समावेश आहे. आघाडी आणि भाजपसाठी राज्यसभेची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. याशिवाय वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्था (Local self-government bodies) मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीतही आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची चिन्हे आहेत.

तसेच महाराष्ट्र विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे विधान परिषदेवर निवडून गेलेल्या 9 सदस्यांची मुदत जुलै 2022 मध्ये संपत आहे. त्यात उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा समावेश आहे. नाशिक, मुंबई, ठाणे, उल्हासनगरसह 10 महापालिकांची मुदत येत्या 3 महिन्यात संपत आहे. त्यामुळे या 10 मनपांसह अन्य 13 अशा एकूण 23 महापालिका, 27 जिल्हा परिषदा, त्या अंतर्गत 309 पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. साहजिकच राज्यात वर्षभर राजकीय वातावरण तापलेले असणार आहे.

यावर्षी मुदत पूर्ण होणारे विधान परिषद सदस्य

भाजप : प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर, प्रसाद लाड, विनायक मेटे, रामनिवास सत्यनारायण सिंह, शिवसेना : सुभाष देसाई, दिवाकर रावते, राष्ट्रवादी काँग्रेस : संजय दौंड. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणारे आणि यावर्षी मुदत संपणारे सदस्य : शिवसेना : रवींद्र फाटक (ठाणे), दुष्यंत चतुर्वेदी (यवतमाळ), भाजप : चंदूभाई पटेल (जळगाव), परिणय फुके (भंडारा -गोंदिया), काँग्रेस : मोहनराव कदम (सांगली सातारा ), अमरनाथ राजूरकर (नांदेड), राष्ट्रवादी काँग्रेस : अनिल भोसले (पुणे).

मुदत संपणार्‍या मनपा

नाशिक, मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, परभणी, चंद्रपूर, लातूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर. मुदत संपलेल्या आणि निवडणुकीच्या प्रतीक्षेतील महापालिका : कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद, कोल्हापूर.

निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य

4 जुलै 2022 ला पुढील राज्यसभा सदस्य निवृत्त होणार आहेत. भाजप : पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे, डॉ. विकास महात्मे, शिवसेना : संजय राऊत, काँग्रेस : पी. चिदंबरम, राष्ट्रवादी काँग्रेस : प्रफुल्ल पटेल.

निवडणूक होणार्‍या जिल्हा परिषदा

नाशिक, अहमदनगर, जळगाव, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com