Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशRBI चा पुन्हा दणका; गृहकर्जासह इतर कर्ज महागणार

RBI चा पुन्हा दणका; गृहकर्जासह इतर कर्ज महागणार

नवी दिल्ली । New Delhi

रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of india) मागील दोन दिवसांपासून पतधोरण आढावा बैठक (Credit policy review meeting) सुरू होती. त्यानंतर आता रिझर्व्ह बँकेकडून (RBI) बैठकीतील निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे…

- Advertisement -

रिझर्व्ह बँकेने महागाईला (Inflation) अटोक्यात आणण्यासाठी रेपो दर (Repo rate) मे महिन्यात ०.४० टक्क्यांनी वाढवण्यात आले होते. या दरवाढीनंतर ४.४० टक्के रेपो रेट झाला होता. आज ०.५० टक्क्यांनी आणखी रेपो दर वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आता रेपो दर ४.९० टक्के इतका असणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Governor Shaktikant Das) यांनी पॉलिसी स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली आहे.

तसेच रेपो दरात वाढ Increase Repo Rate) झाल्याने त्याचा परिणाम गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जांवर (loan) होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) द्वि-मासिक बैठक ६-८ जून दरम्यान झाली, ज्यामध्ये दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या