Friday, April 26, 2024
Homeमनोरंजन‘द काश्मीर फाइल्स’ पाहण्याची उत्सुकता पडू शकते भारी; पोलिसांकडून अलर्ट जारी

‘द काश्मीर फाइल्स’ पाहण्याची उत्सुकता पडू शकते भारी; पोलिसांकडून अलर्ट जारी

दिल्ली | Delhi

द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपटाची सगळीकडेच चर्चा सुरू आहे. द कश्मीर फाईल्स सिनेमा बॉक्स ऑफिसबरोबरच चित्रपटगृहांबाहेरही चर्चेचा विषय ठरला आहे.

- Advertisement -

चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या उत्सुकता पाहता याचा गैरफायदा सायबर गुन्हेगार (Cyber ​​criminals) घेत आहेत. अनेक ठिकाणी ‘द काश्मीर फाइल्स’च्या मोफत डाउनलोड (The Kashmir Files free download link) लिंक पाठवून फसवणूक (Cyber Crime) केल्याच्या घटना घडल्या आहेत.

नोएडा पोलिसांनी (Noida police) याबाबत लोकांना सतर्क केले आहे. नोएडा पोलिसांनी लोकांना या चित्रपटाशी संबंधित सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवरील (WhatsApp fake link) संशयास्पद लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे. (The Kashmir Files Cyber Crime)

‘सायबर गुन्हेगार मोफत चित्रपटांचे आमिष दाखवून लोकांना लिंक पाठवतात. लोकही अशा अमिषाला बळी पडतात आणि त्या लिंकवर क्लिक करतात. त्यानंतर हे गुन्हेगार वापरकर्त्यांचे फोन हॅक करून त्यांची बँक खाती रिकामे करू शकतात.’ असे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

काश्मीरातील पंडितांवर झालेल्या अत्याचाराबाबत कथा या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. भाजपा (BJP) शासित राज्यात द कश्मीर फाइल्स हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. तर काँग्रेसनं (Congress) या सिनेमावरून भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. सिनेमागृहात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’वर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Modi) भाष्य केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या