Monday, April 29, 2024
Homeजळगाववाळू माफियाकडून पोलिसाने घेतली लाच, एसीबीने आणली टाच

वाळू माफियाकडून पोलिसाने घेतली लाच, एसीबीने आणली टाच

अडावद Adavad ता. चोपडा –

वाळूची वाहतूक करण्यासाठी चार हजाराची लाच (bribe) मागणाऱ्या पोलीस (Police) कर्मचाऱ्यासह अन्य एकाला  लाचलुचपत विभागाच्या (ACB) पथकाने कारवाई करत दोघांना अटक (arrested) केली आहे. या कारवाईमुळे वाळू वाहतूक करणाऱ्यां मध्ये खळबळ  उडाली आहे.

- Advertisement -

चोपडा तालुक्यातील तापी नदीतून वाळूची सर्रासपणे चोरटी वाहतूक केली जात आहे. याला पोलीसांकडून मुक संमती असल्याचे वारंवार समोर येत आहे. अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू वाहतूकदारांकडून चार हजारांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरटी वाळू वाहतूक करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.
दरम्यान,  अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी कोणतीही कारवाई करू नये यासाठी अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी योगेश गोसावी याने पंटरच्या माध्यमातून ४ हजाराची लाच मागितली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. याची सत्यता पडताळणीसाठी जळगावच्या एसीबी पथकाने शनिवारी २८ जानेवारी रोजी सापळा रचून अडावद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी योगेश गोसावी आणि खासगी पंटर चंद्रकांत कोळी यांना रंगेहात पकडले आहे.

विशेष म्हणजे अडावद पोलीस ठाण्याच्या आवारातच  खासगी पंटरने लाच स्विकारल्याने त्याला जागेवरच ताब्यात घेतले. ही कारवाई एसीबीचे उपअधिक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. 

- Advertisment -

ताज्या बातम्या